आपला विदर्भ

माजी आमदार दिपक दादा आत्राम यांच्या हस्ते कोरोना योद्धांच्या सत्कार

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क

माजी आमदार दिपकदादा आत्राम यांचेकडून करोना योद्धचा सत्कार

■ अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णवाहकाचे चालकांना शाल व श्रीफळ देऊन केले सत्कार.

आलापल्ली:- राज्यात आलेल्या महाभयंकर करोना साथरोगामुळे दळणवळण व्यवस्था पूर्णपणे बंद होते.अश्यावेळी अहेरी तालुक्यासह आलापल्ली परिसरातील परिसरातील रुग्णांना अहेरी व गडचिरोली येथील रुग्णालयात रुग्णांना नेण्यासाठी अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयातील रुग्ण वाहकाचे चालक मेहराज शेख,रोशन सय्यद,जावेद शेख हे तिघेही लाकडाऊनच्या काळात आपल्या जीवाची पर्वा न करता,आपल्या कुटुंबाची विचार न करता एक माणुसकीने ते रात्र बेरात्री रुग्णांना रुग्णलयात पोहचवत होते.
हे तिघे करोना योद्धा लाकडाऊनच्या काळात उत्तम कार्य करून अनेक रुग्णाचे जीव वाचविले आहे.ही बाब अहेरी विधानसभेचे माजी आमदार दिपकदादा आत्राम याना कळताच दिपकदादा यांनी आपल्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधून कोरोनाच्या काळात स्वयंपूर्तीने उत्तम कार्य केलेल्या उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णवाहिकाचे वाहन चालक असल्या त्या तीन कोरोना योद्धाचा सत्कार करण्याचा निर्णय घेण्यात आले आहे.आणि माजी आमदार दिपकदादा आत्राम व अविसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मेहराज,रोशन,जावेद या तीन करोना योद्धाना शाल,श्रीफळ व रोख रक्कम देऊन माजी आमदार दिपकदादा आत्राम यांचे हस्ते सत्कार करण्यात आले.
रुग्ण वाहिकाचे सत्कार करताना मिलिंद अलोने,दीपक गुरूनूले,प्रशांत भिमटे,विश्वदीप दुर्गे,परशुराम दाहगावकरसह आदिवासी विध्यार्थी संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *