आपला विदर्भ छत्तीसगड तेलंगणा देश महाराष्ट्र मुलाखत राशिभविष्य रोजगार वार्ता संपादकीय

पद्मावत

शुक्रवार आला की आपण वाट पाहातो ती नव्या सिनेमाची. पण यावेळी मात्र एक दिवस आधीच म्हणजे गुरुवारी चित्रपट प्रदर्शित होतोय. या सिनेमाचं नाव आहे बहुचर्चित असा पद्मावत.

संजय लीला भन्साळी यांच्या या नव्या सिनेमाची सर्वांनाच उत्सुकता आहे. या चित्रपटाचं शूट सुरू झाल्यापासून हा सिनेमा सतत चर्चेत आहे. कधी सेट जाळले गेले तर कधी दिग्दर्शकाला मारहाण झाली. कलाकारांच्या नावाचे फतवे काढले गेले. आणि या अडचणी कमी म्हणून की काय, सेन्सॉर बोर्डाने आपला नियम दाखवत या सिनेमाचं प्रदर्शन पुढे ढकललं. आणि आता अखेर २५ जानेवारीला हा सिनेमा प्रदर्शित होतो आहे.

संजय लीला भन्साळी यांनी यापूर्वी केलेले चित्रपट पाहता सिनेमा या माध्यमाकडे अत्यंत गांभीर्याने पाहणारा दिग्दर्शक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. आपला हा वकुब त्यांनी या चित्रपटातही पाळला आहे.

या सिनेमाचं शूट सुरू झाल्यापासून चर्चा होती ती या सिनेमात दिग्दर्शकाने घेतलेल्या सिनेमॅटिक लिबर्टीची. या सिनेमातही त्यांनी तशी लिबर्टी घेतली आहे. मग ते राणी पद्मावतीचं घुमर गाण्यातला नाच असो किंवा अल्लाउद्दीन खिल्जीचं खलबलीमधला नाच असो. एक नक्की की अशी लिबर्टी घेताना ऐतिहासिक व्यक्तिरेखांची मानहानी होऊ नये याची काळजी घेतली जायला हवी. ती इथे घेतलेली दिसते. राजपूत घराणं, राजा रतनसिंह, पद्मावती यांचा मान, आब राखत हा चित्रपट बनवला गेला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *