आपला विदर्भ

बाहेरून आलेल्यांना गृह विलगिकरणाऐवजी संस्थात्मक विलगीकरणात ठेवा….संतोष ताटीकोंडावार यांची मागणी

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क

बाहेरुन आलेल्यांना गृह विलगीकरणाऐवजी संस्थात्मक विलगीकरणात ठेवा

  • संतोष ताटीकोंडावार यांची मागणी
    गडचिरोली. जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. असे असतांनाही परराज्यातून व बाहेरील जिल्ह्यातून जिल्ह्यात प्रवेश करणे सुरुच आहे. अशास्थितीत बाहेरुन येणा-यांना गृह विलगीकरणात न ठेवता संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात यावे, अशी मागणी जनकल्याण समाजोन्नती अन्याय, भ्रष्टाचार निवार समितीचे जिल्हाध्यक्ष संतोष ताटीकोंडावार यांनी पत्रकातून केली आहे.
    ताटीकोंडावार यांनी पत्रकात म्हटले आहे की, जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. अशा स्थितीतही बाहेरुन जिल्ह्यात दाखल होणा-यांचे प्रमाण कायम आहे. अशा व्यक्तींना संस्थात्मक विलगीकरणात न ठेवता गृह विलगीकरणात ठेवण्यात येत आहे. अशा व्यक्तींमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. लॉकडाऊन व संचारबंदी काळात स्वगावी गेलेले मजूरही परतीच्या मार्गावर आहेत. त्यामुळे धोका बळावण्याची शक्यता बळावली आहे. त्यामुळे बाहेरुन येणा-यांना गृह विलगीकरणाची परवानगी न देता संस्थात्मक विलगीकरणात ठेवावे, अशी मागणी ताटीकोंडावार यांनी पत्रकातून केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *