आपला विदर्भ

गडचिरोलीचे पालकमंत्री पद ना.वडेट्टीवार यांच्याकडेच ठेवा…जि.प.अध्यक्ष कंकडालवार व जि.प. उपाध्यक्ष पोरेटी यांची मागणी

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क…

गडचिरोली जिल्ह्याचे सर्वांगीण विकासासाठी पालकमंत्री पद राज्याचे कॅबिनेट मंत्री ना.विजय वडेट्टीवार यांच्या कडे ठेवण्याची मागणी गडचिरोली जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार व उपाध्यक्ष मनोहर पोरेटी यांनी केली आहे. कोविड -19 मुळे जिल्ह्याचे पालकमंत्रीचे प्रभार हे कॅबिनेट मंत्री व चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडे तीन महिन्यांपूर्वी देण्यात आलं.परंतु दोन दिवसांपूर्वी परत जिल्ह्याचे पालकमंत्री पद ना.एकनाथ शिंदे यांच्याकडे देण्यात आले.ना.शिंदे यांना पालकमंत्री बनविल्यामुळे जिल्ह्यात कही खुशी कही गम असे वातावरण निर्माण झाले असून पालकमंत्री पदासाठी जिल्ह्यातील महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. आपल्या तीन महिन्यांच्या कालावधीत प्रभारी पालकमंत्री वडेट्टीवार यांनी जिल्ह्यात रिकार्ड ब्रेक दौरे करून अनेक शासकीय बैठका घेऊन जिल्ह्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांवर वचक ठेवण्याचं प्रयत्न केला.जिल्ह्याचा विकासासाठी जिल्हा प्रशासनाला राज्य सरकारकडून भरीव निधी उपलब्ध करून दिला.जिल्ह्यातील अनेक महत्वपूर्ण समस्या मार्गी लावण्याचं त्यांनी पुरेपूर प्रयत्न केला.ना.वडेट्टीवार यांना जिल्ह्यातील संपूर्ण परिस्थितीची चांगला जाणीव असल्याने त्यांच्याकडे जिल्ह्याचे पालकमंत्री पद कायम राहिल्यास जिल्ह्यातील समस्यावर मार्गी लागणार असल्याने त्यांच्या कडे पालकमंत्री पद कायम ठेवण्याची मागणी जि.प.अध्यक्ष कंकडालवार व उपाध्यक्ष पोरेटी यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *