आपला विदर्भ

स्वस्त धान्य दुकानांना अन्न-धान्य पुरवठा करणाऱ्या अहेरी व एटापल्ली येथील वाहन चालकांना समायोजन करून घेण्याची मागणी!

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क

अन्न धान्य पुरवठा करण्याऱ्या वाहनचालकांनी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडलावार याना केले निवेदन सादर

■ वाहन चालकांना समयोजन करून न्याय मिळवून देण्याची मागणी

अहेरी:प्रतिनिधी
उप प्रादेशिक कार्यालय अहेरी (उच्च श्रेणी) अंतर्गत अहेरी आणि एटापल्ली तालुक्यात 22 रुपये प्रति क्विंटल प्रमाणे वाहनाने अन्न धान्य वाहतूक करत होते.मात्र प्रति क्विंटल 22 रुपये प्रमाणे सदर कार्यालयाला वाहतूक करणे परवडत नसल्याने हे अन्न धान्य वाहतूक खाजगी वाहनाने वाहतूक करण्याचा निर्णय घेतल्याने अनेक वर्षांपासून अन्न धान्याचे वाहन चालवून कुटुंबाची उदरनिर्वाह करणाऱ्या वाहनचालकांवर उपासमारीची वेळ आल्याने अहेरी व एटापल्ली तालुक्यातील अन्न,धान्य वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांनी आम्हाला समायोजन करून न्याय मिळवून देण्यात यावी अशी मागणी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
उप प्रादेशिक कार्यालय अहेरी यांनी अहेरी व एटापल्ली तालुक्यात धान्य पुरवठा करणाऱ्या वाहनांना जमा करण्याचे आदेश देऊन जिल्हा पुरवठा कार्यालय गडचिरोली यांनी आपल्या वाहनाने 22 रुपये प्रति क्विंटल प्रमाणे वाहतूक खर्च करण्यास कार्यालय सक्षम नसल्याचं कारण देत अहेरी व एटापल्ली तालुक्यातील सात वाहने उभी केले.निविदा काढून खाजगी वाहनाने धान्य वाटप करण्यात येत असल्याने आमच्या हातातील काम गेल्याने उदरनिर्वाह करणे कठीण होत आहे. निविदा प्रक्रिया झालेल्या टेंडरमध्येच आमच्या वाहनाना समायोजन करून घेण्यात यावी अशी मागणीअहेरी व एटापल्ली येथील वाहनचालकानी केली आहे.
निवेदन सादर करते वेळी बेरोजगार झालेले सात वाहनाचे वाहन चालक उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *