आपला विदर्भ

गडचिरोली जिल्ह्याच्या विकासासाठी ना.वडेट्टीवार यांच्याकडे पालकमंत्रीपद देण्याची युवक काँग्रेसची मागणी

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क

जिल्हयाच्या विकासासाठी ना.विजय वडेट्टीवार यांच्याकडे पालकमंत्रीपद देण्यात यावे
युवक काॅंग्रेसचे महासचिव कुणाल पेंदोरकर यांची मागणी,

मुख्यमंत्री,महसूलमंत्री यांना पाठविणार 10 हजार पत्र

गडचिरोली जिल्हयाचा विकास झपाटयाने करावयाचा असेल तर गडचिरोली जिल्हयाचे पालकमंत्रीपद राज्याचे बहुजन कल्याण, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडे देण्यात यावे, अशी मागणी युवक काॅंग्रेसचे महासचिव कुणाल पेंदोरकर यांनी केली आहे. ही मागणी केवळ काॅंग्रेस कार्यकत्यांची नसून समस्त जिल्हावासीयांची असून यााबाबत राज्याचे मुख्यमंत्री व महसूलमंत्री यांना 10 हजार पत्र पाठविण्यात येणार असल्याचे पेंदोरकर यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकातून स्पष्ट केले आहे.
कुणाल पेंदोरकर यांनी म्हटले आहे की, गडचिरोली जिल्हा ना.विजय वडेट्टीवारांची कर्मभूमी आहे. त्यांची राजकीय जडणघडण या जिल्हयातूनच झाली. त्यांना जिल्हयातील समस्यांची जाण आहे. जिल्हयाचा विकास घडून यावा याबाबत त्यांची तळमळ आहे. निसर्गाने गडचिरोली जिल्हयाला भरभरून दिले आहे. परंतू या येथील उपलब्ध साधनसंपत्तीवर आधारीत उद्योग निर्माण न झाल्याने जिल्हा उद्योग विरहीत व मागासलेला आहे. जिल्हयाचा विकास घडवून आणायचा असेल धडाडीचे निर्णय घेणारा व जिल्हयातील समस्या शासनाच्या दरबारी लावून धरणाऱ्या नेत्याची गरज असून ही क्षमता ना.वडेट्टीवार यांच्यामध्ये आहे, असेही पेंदोरकर यांनी स्पष्ट केले आहे.
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर ना. विजय वडेट्टीवार यांच्याकडे चंद्रपूर जिल्हयाच्या पालकत्वाची जबाबदारी सोपविण्यात आली, तर गडचिरोलीचे पालकत्व राज्याचे नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्हयाचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सोपविण्यात आले. मात्र कोरोनाच्या संकटात काही काळासाठी गडचिरोली जिल्हयाचे पालकमंत्रीपद ना.विजय वडेट्टीवार यांच्याकडे सोपविण्यात आले. त्यांनी चंद्रपूर व गडचिरोली जिल्हयाबाबत कोणताही दुजाभाव केला नाही. मागील तीन.-चार महिन्याच्या कालावधीत ना.वडेट्टीवार यांनी चंद्रपूर व गडचिरोली जिल्हयाच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी यशस्वीरित्या सांभाळली. त्यामुळे या दोन्ही जिल्हयात कोरोना नित्रंणात आहे.
ना.वडेट्टीवार यांच्याकडे गडचिरोलीचे पालकत्व सोपविण्यात आल्यानंतर त्यांनी जिल्हयाच्या विकासाबाबत अनेक धाडसी निर्णय घेतले आणि त्यांची कार्यवाही शासनस्तरावर सुरू आहे. त्यांनी अल्पावधीतच गडचिरोली येथे मेडीकल काॅलेज मंजूर करून घेतले आहे. गोंडवाना विद्यापीठासाठी सेमाना मार्गावर वनजमिन मिळण्यासाठी कार्यवाही सुरू केली आहे. शेतकऱ्यांसाठी खत कमी पडू नये म्हणून आधीच उपयोजना केलं आहे. जिल्हयातील ओबीसीचे आरक्षण पुर्ववत 19 टक्के लागू करण्यासाठी शासनाकडे जोर लावला आहे. यामुळेच शासनाने राज्याचे अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली एक उपसमितीे नेमली आहे. अनुसूचित जाती, जमातीच्या विद्याथ्र्यांप्रमाणेच ओबीसी विद्याथ्र्यांना चांगले शिक्षण मिळावे, शैक्षणिक सुविधांचा लाभ मिळावा म्हणून ओबीसी कल्याण मंत्रालयामार्फत महाज्योती नावाने स्वायत्त संस्था कार्यान्वीत करण्यास महत्वपुर्ण भूमिका बजावली. मागील वर्षी कुंभी येथे नाल्यात 12 वर्षीय मुलगा वाहून गेल्याने ना. वडेट्टीवार यांनी त्या नदीवर पूल बांधण्याचे आदेश सुद्धा देण्यात आले आहे. अतिदुर्गम भागात रस्ते पुलांसाठी दरवर्षी कोटींचा निधी मंजूर करून दिला आहे. ना.वडेटीवार यांना गडचिरोली जिल्हयाच्या विकासाची तळमळ असून त्यांनी चंद्रपूर बरोबरच गडचिरोलीचे पालत्व स्विकारण्यास तयार असल्याचे त्यांचे अनेकदा बोलून दाखविले आहे. जिल्हयाचा विकास साधायचा असेल तर ना. विजय वडेट्टीवार यांच्याकडेच गडचिरोलीचे पालकमंत्री पद द्यावे, अशी मागणी युवक काॅंग्रेसचे महासचिव कुणाल पेंदोरकर यांनी राज्यशासनाकडे केली आहे. यासाठी युवक काॅंग्रेसच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व प्रदेश काँग्रेस अध्यक्ष महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना 1 हजार पत्र पाठविण्यात येणार असल्याचे पेंदोरकर यांनी स्पष्ट केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *