आपला विदर्भ

गडचिरोलीचे पालकत्व जिल्ह्याचे स्थानिक असलेल्या ना.विजय वडेट्टीवार यांच्याकडे असावा–माजी आमदार दिपक दादा आत्राम

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क

गडचिरोली जिल्हा हे निर्मितीपासून तर आजपर्यंत अनेक समस्यांना सामोरे जात असून जिल्ह्याचे सामाजिक ,आर्थिक व भौगिलीक परिस्तितीची जाणीव असलेल्या व या जिल्ह्याची स्थानिक असलेल मंत्रिमंडळात वजनदार राज्याचे कॅबिनेट मंत्री व चंद्रपूर चे पालकमंत्री ना.विजयभाऊ वडेट्टीवार यांच्याकडे गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री पद कायमसाठी दिल्यास जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळेल याविषयी राज्याचे महाविकास आघाडी सरकारने सकारात्मक निर्णय घ्यावं असे मत आदिवासी विद्यार्थी संघाचे नेते व अहेरीचे माजी आमदार दिपक दादा आत्राम यांनी व्यक्त केलं.

ना.वडेट्टीवार यांनी प्रभारी पालकमंत्री म्हणून मागील तीन महिन्यात गडचिरोली जिल्ह्यातील काही महत्वपूर्ण समस्या मार्गी लावण्याचे आटोकाट प्रयत्न केले. अल्पवधीतच जिल्ह्यात विकास कामांचे धडाका लावले.तीन महिन्यात जिल्हा मुख्यालयी अनेक बैठका लावून जिल्ह्यातील अनेक समस्यां मार्गी लावले. कोविड -19 साठी त्यांनी जिल्ह्याला आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून जिल्ह्याला भरीव निधी उपलब्ध करून दिले.राज्यातील महाविकास आघाडी सरकारने गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री पदाबद्दल फेरविचार करून ना.वडेट्टीवार यांच्याकडे गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री पदी कायम ठेवण्याची मागणी ही माजी आमदार दिपक दादा आत्राम यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *