आपला विदर्भ

तानबोडी येथील जि.प.शाळेचे नवीन वर्गखोलीचे उदघाटन सोहळा संपन्न

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क

तानबोडी येथील जि.प. शाळेत नवीन वर्ग खोलीचे उदघाटन सोहळा संपन्न
जिल्हा परिषद अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांनी केली उदघाटन
प.स.सभापती व उपसभापती यांची प्रमुख उपस्थिती
📝जिल्हा परिषद् गडचिरोली पंचायत समिती अहेरी अंतर्गत ग्राम पंचायत कार्यालय किष्टापूर अंतर्गत मौजा तानबोडी येथे जिल्हा परिषद शाळा असून इयत्ता १ली ते ४थी पर्यत शिक्षण असून विध्यार्थी शिक्षण घेत आहेत मात्र या शाळेची वर्गखोलीच्या कमतरता असल्याने विद्यार्थ्याना शिक्षण घेण्यासाठी अडचण होत होती. जि.प.अध्यक्ष मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार* यांच्याकडे मागणी केली असता, जि.प.अध्यक्ष यांनी सन २०१८-१९ जिल्हा वार्षिक योजना व अंकाक्षीत योजनेच्या निधी तून नविन वर्ग खोली उपलब्ध करून दिली असून सदर नवीन वर्ग खोलीच्या बांधकाम पूर्ण पणे झाले असल्याने आज श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आली.
असून सदर उदघाटनला,पंचायत समितीचे सभापती श्री.भास्कर तलांडे,उपसभापती सौ.गीताताई चालुरकर,तानबोडीचे मा.उपसरपंच श्री.अशोक येलमूले, शा.व्य.समिती अध्यक्ष श्री.भास्कर येलमूले ,पोलीस पाटील वसंत मडावी, कोष स.अध्यक्ष दादाराव मडावी,मुख्याध्यापक श्री.अशोक दहागावकर,सदाशिव सडमेक ,नारायण शेंडे,गणेश नागपूरवार, प्रशांत गोडशेलवार,राकेश सडमेक आदि उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *