आपला विदर्भ

वेलगुर येथील जि.प.प्रा.शाळेचे दोन नवीन वर्ग खोली सह संरक्षक भिंतीचे उदघाटन सोहळा संपन्न

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क

वेलगुर येथील जि.प.शाळेत नवीन दोन वर्ग खोली सहित संरक्षणभिंतीचे उदघाटन
जिल्हा परिषद अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांनी केली उदघाटन
प.स.सभापती व उपसभापती यांची प्रमुख उपस्थिती
📝जिल्हा परिषद् गडचिरोली पंचायत समिती अहेरी अंतर्गत ग्राम पंचायत कार्यालय वेलगुर येथे जिल्हा परिषद शाळा असून इयत्ता १ली ते ७ वी पर्यत शिक्षण असून विध्यार्थी शिक्षण घेत आहेत मात्र या शाळेची वर्गखोलीच्या कमतरता असल्याने विद्यार्थ्याना शिक्षण घेण्यासाठी अडचण होत होती. जि.प.अध्यक्ष मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार* यांच्याकडे मागणी केली असता,मागणीचे पुरतात करत जि.प.अध्यक्ष यांनी सन २०१८-१९ व २०१९-२० जिल्हा वार्षिक योजना व अंकाक्षीत योजनेच्या निधी तून नविन दोन वर्ग खोली उपलब्ध करून दिली असून सदर नवीन वर्ग खोलीच्या बांधकाम पूर्ण पणे झाले आहे.तसेच १३वने महसूल योजने अंतर्गत शाळेसाठी संरक्षण भितीचे बांधकाम करण्यात आले असून काल श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आली.
असून सदर उदघाटनला,पंचायत समितीचे सभापती श्री.भास्कर तलांडे,उपसभापती सौ.गीताताई चालुरकर,माजी सरपंच कुसुम दूधि,मा.सरपंच श्री.लालू करपेत,माजी उपसरपंच श्री.उमेश मौहूर्ले,शा.व्य.समिती अध्यक्ष श्री.दिलीप राऊत,माजी तानबोडीचे उपसरपंच श्री.अशोक येलमूले, मुख्याध्यापक कुसनाके सर,साईनाथ नागोसे,विलास शेंडे,प्रवीण रेशे,किशोर वसाके,हरी आत्राम,रोहित गलबले,राहुल ओंडरे,प्रशांत गोडसेलवार,राकेश सड़मेक आदि उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *