आपला विदर्भ

आता नवेगाव येथील नागरिकांना मिळणार शुद्ध पिण्याचे पाणी

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क

ग्रा.प.वेलगुर अंतर्गत नवेगाव येथील नागरिकांना मिळणार शूध्द पिण्याचं पाणी

▪जि.प.अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या शुभहस्ते लोकांर्पण कार्यक्रम सम्पन्न

✒अहेरी तालुक्यातील ग्राम पंचायत कार्यालय वेलगुर अंतर्गत येत असलेल्या नावेगाव येते राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम अंतर्गत पाण्याची टाकीची बांधकाम करण्यासाठी मंजूर होती मात्र गेल्या पाच वर्षापासून कामं रखळले होते जिल्हा परिषद अध्यक्ष श्री अजयभाऊ यांच्या सतत पाठ पुराव्यांतून सदर कामं पूर्ण झाले असून वेलगुर गावातील नागरिकांना सुध्द पिण्याचं पाणी मिळणार आहे. सदर पिण्याचं पाण्याच्या टाकीचे नुकतेच जिल्हा परिषद अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते लोकांर्पण करण्यात आली आहे. यावेळी अहेरी पंचायत समितीचे सभापती श्री.भास्कर तलांडे,उपसभापती सौ.गीताताई चालुरकर,कार्यकारी अभियंता पाणी पुरवठा जि.प.गड.अमित तूरकर,अहेरीचे कनिष्ठ अभियंता प्रवीण झाडे, माजी सरपंचा कुसुम दूधी,माजी उपसरपंच अशोक येलमूले,लालू करपेत,उमेश मौहूर्ले,संतोष वसाके,बंडु नागोसे,विलास शेंडे,शंकर दशरवार,संजय बावने,प्रशांत गोडसेलवार व गावातील नागरिक उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *