आपला विदर्भ

आदित्य हत्ती मृत्यू प्रकरणाची चौकशी थंडबसत्यात !

‘आदित्य’ हत्ती मृत्यू प्रकरणाची चौकशी थंडबस्त्यात

  • संतोष ताटीकोंडावार यांची वनमंत्र्यांना साद
    वार्ताहर@अहेरी
    तालुक्यातील कमलापूर येथील वनविभागाच्या शासकीय हत्तीकॅम्प येथे 29 जुन रोजी आदित्य नामक 4 वर्षीय हत्तीचा मृत्यू झाला होता. या मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करुन दोषींवर करण्यात यावी, अशी मागणी मुख्य वनसंरक्षक यांच्याकडे केली असतांनाही यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. सदर प्रकरण थंडबस्त्यात पडल्याची शंका उपस्थित करीत भ्रष्टाचार निवारण समितीचे जिल्हाध्यक्ष संतोष ताटीकोंडावार यांनी थेट वनमंत्र्यांना साद घालित प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्याची विनंती केली आहे.
    तांटीकोडावार यांनी तहसिलदारांमार्फत वनमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कमलापूर येथील एकमेवर शासकीय वनविभागाच्या हत्तीकॅम्प येथे 29 जुन 2020 रोजी आदित्य या 4 वर्षी हत्तीचा मृत्यू झाला होता. या वनविभागाच्या वरिष्ठांकडून हयगय करण्यात आल्याचा आरोप कमलापूरवासीयांसह वन्यजीव प्रेमींनी केला होता. त्यामुळे आदित्यच्या मृत्यूची सखोल चौकशी करुन दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मुख्य वनसंरक्षक गडचिरोली यांचेकडे केली होती. मात्र वनविभागाद्वारे यावर कोणती कारवाई झाली याबाबत अद्यापपर्यंत काहीही माहिती कळू शकली नाही.
    वनविभागाच्या काही अधिका-यांच्या चुकीमुळे आदित्यचा जीव गेला आहे. यापूर्वीसुद्धा याच ठिकाणी 2014 साली कृष्णा नावाच्या हत्तीचा जीव गेला होता. मात्र वनविभागाला अद्यापही जाग आलेली नाही. त्यामुळे हत्तीच्या जीवाला धोका निर्माण झाला असून अशा घटना टाळण्यासाठी कमलापूरचे वैभव टिकविण्यासाठी अशा बेजबाबदार अधिका-यांवर कारवाईची गरज आहे. त्यामुळे या प्रकरणाची योग्य चौकशी करुन दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी जनकल्याण समाजोन्नती अन्याय भ्रष्टाचार निवारण समितीचे जिल्हाध्यक्ष संतोष ताटीकोडावार यांनी तहसिलदारांमार्फत वनमंत्री संजय राठोड यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *