आपला विदर्भ

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील रिक्त पदे तातडीने भरण्याची मागणी

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क

गडचिरोली जिल्हापरिषदेच्या आरोग्य विभागातील रिक्त पदे तातडीने भरा
•जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी निवेदनाद्वारे केली सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांचेकडे मागणी गडचिरोली- गडचिरोली जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी गडचिरोली जिल्हापरिषदे अंतर्गत आरोग्य विभागाची रिक्त पदे त्वरित भरून जिल्ह्यतील आरोग्य यंत्रणेवरचा ताण कमी करावा अशी आग्रही मागणी मुख्य शासकीय ध्वजारोहणासाठी गडचिरोली जिल्ह्यच्या दौऱ्यावर आलेल्या सार्वजनिक आरोग्य, वैद्यकीय शिक्षण, राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. गडचिरोली जिल्हा हा नक्षलग्रस्त, अतिसंवेदनशील व दुर्गम व आदिवासी जिल्हा असल्यामुळे इथे आरोग्य यंत्रणा सक्षम असणे गरजेचे आहे.तरीसुद्धा येथील आरोग्य विभागाचे अनेक पदे रिक्त असल्यामुळे जिल्ह्यतील नागरिकांना आरोग्याच्या सोयीसुविधा पुरविण्यात खूप अडचणी येत आहे.दुर्गम भागातील अनेक गावात जाण्यासाठी रस्ते नसून अपुऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांमुळे लोकांना आरोग्याच्या सोयी पुरविता येत नाही.एका आरोग्यसेंवकाकडे अनेक गावांचा प्रभार सोपविण्यात आला त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर ताण पडला. या सर्व बाबींची गंभीर दखल घेऊन गडचिरोली जिल्ह्यातील आरोग्य विभागाची रिक्त पदे तातडीने भरून जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेवरचा ताण कमी करावा.अशी मागणीही जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी आरोग्य मंत्र्यांकडे केली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *