आपला विदर्भ

वेडमपल्ली येथे नवीन ग्रामपंचायत भवनाची भूमिपूजन संपन्न

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क

वेडमपली येते नविन ग्राम पंचायत भवनाची भूमिपूजन सम्पन्न
▪️जि.प.अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते भूमिपूजन.
▪️पंचायत समिती सभापती,जि.प.सदस्य,प.स.सदस्य प्रामुख्याने उपस्थित
🔸जिल्हा परिषद गडचिरोली पंचायत समिती अहेरी अंतर्गत ग्राम पंचायत कार्यालय वेडमपली येते ग्राम पंचायत भवन नसल्याने गावातील समाज मंदिरात ग्राम पंचायतींचे कामकाज सुरू होते सदर बाब जिल्हा परिषद अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांना माहिती झाली , जि.प.अध्यक्ष यांनी स्वतः लक्ष घालून ग्राम पंचायत भवनासाठी राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान व १४ व्या वित्त आयोग अंतर्गत मंजूर करण्यात आले असून वेडमपली येते सुसज्ज असे ग्राम पंचायत भवनाची बांधकाम करण्यात येणार असून आज *जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार
यांच्या शुभ हस्ते भूमिपूजन करण्यात आले आहे.
या भूमिपूजन सोहळ्याचे अध्यक्ष म्हणून अहेरी पंचायत समितीचे सभापती श्री.भास्कर तलांडे होते.तर यावेळी वेडमपली ग्राम पंचायतीचे सरपंच श्री.अजय मिशाल,जिल्हा परिषद सदस्य श्री.अजय नैताम,पंचायत समिती माजी उपसभापती तथा विद्यमान प.स.सदस्य सौ.सुरेखा आलाम,सचिव सिडाम व कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *