आपला विदर्भ

मरपल्ली नाल्यावर होणार पुलाची बांधकाम!

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क

मरपल्ली नाल्यावर होणार पुलाची बांधकाम
जि.प.अध्यक्ष,श्री अजयभाऊ कंकडालवार यांनी भेट देवून आश्वासन दिली
✍️अहेरी :-तालुक्यातील मरपल्ली हा गाव आलापली- सिरोंचा या राष्ट्रीय महामार्गावरून 15 ते -20 कि. मी. अंतरावर दक्षिणेकडे वसले आहे या गावाची लोकसंख्या जवळपास 1000 – 1500 एवढी आहे.
या परिसराला दैनंदिन जीवनात नेहमीच प्रत्येक समस्येवर सामना करावा लागतो. कारण या परिसरात आरोग्य. शिक्षण. विद्युत व दळणवळण. ईत्यादी समस्यांचा सामना प्रत्येक वर्षी करावा लागतो. कारण मरपल्ली या गावाला जाण्यासाठी हा एकमेव मार्ग आहे. आणि प्रत्येक वेळी प्रत्येक कामासाठी बाहेर चा गावाला जावसं लागतो. तालुका स्थळावर शासकीय व खासगी कामासाठी तसेच दवाखान्यात उपचारासाठी जावी लागते.
अणि त्या ठिकाणी कार्यरत असलेले प्रत्येक कर्मचारी ये जा करतात ते कर्तव्य बजावत असताना कर्मचार्‍यांना सुद्धा दळणवळण चा सामना करावा लागतो.
एक सर्वात मोठा नाला आहे. आणि पावसाळ्यात या नाला नेहमीच पाणी वाहत असतो.त्यामुळे नाल्यातून गावातील नागरिकांना ये जा करण्यास अडचण होत आहे. सदर बाब जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्री अजयभाऊ कंकडालवार यांना माहिती होताच आज त्यांनी सदर गावाजवळील नाल्यावर पूल बांधकाम करण्यासाठी निधी उपलब्ध करून दिले असून दिवाळी पासून सदर काम सुरू करण्यात येईल असे सांगितले असून सदर नाल्यावर प्रत्यक्ष जावून पाहणी केली.
यावेळी पंचायत समिती सभापती श्री.भास्कर तलांडे,जिल्हा परिषद सदस्य श्री.अजय नैताम,प.स.सदस्य सौ.सुरेखा आलाम,श्री.अजय मिसाल ग्रा.प.सरपंच वेडमपली, प.स.सदस्य शारदा कोरेत,हणमतू कोरेत माजी सरपंच मरपल्ली,श्रीनिवास मडावी,किस्टय्या सोयाम, बापू बेडकी,बापू तोगम, मोरेश्वर कोडगुर्ले,जिल्हा परिषदेचे कनिष्ठ अभियंता श्री.एस.आज़म श्री.रूपरेला,तिमरमचे माजी सरपंच श्री.महेश मडावी,सुरेश पोरतेट विनोद तोरेम,धर्मराज सड़मेक,प्रशांत गोडसेलवार,कार्तिक तोगम, व गावातील नागरिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *