आपला विदर्भ

टेकडाताल्ला येथे बी.एस.एन.एल.ची टॉवर उभारा… आदिवासी विद्यार्थी संघाची मागणी

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क

सिरोंचा तालुक्यातील टेकडाताल्ला येथे दूरसंचार विभागाची टॉवर उभारण्याची मागणी आविसचे तालुका अध्यक्ष बानय्य जनगम व कार्यकर्ते साई मंदा यांनी केली आहे. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अजयभाऊ कांकडालवार व उपाध्यक्ष मनोहरभाऊ पोरेटी यांना निवेदन देऊन संबंधित विभागाकडे शिफारश करण्याची मागणी केली आहे टेकडाताल्ला विभागात 20 गावे समाविष्ट असून मोबाईल नेटवर्क अभावी अनेकांची कामे खोळंबत असून टेकडाताल्ला येथे मोबाईल टॉवर उभारल्यास 20 गावातील मोबाईल धारक व नागरिकांना सोयीचे होईल असेही निवेदनात नमूद केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *