आपला विदर्भ

सिरोंचा येथे पुरात अडकलेल्या आठ जणांना वाचविण्यात आपती व्यवस्थापन विभागाला आलंय यश !

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क

सिरोंचा…गोसेखुर्द प्रकल्पाचे पाणी सोडल्यानंतर सिरोंचा येथील प्राणहिता नदीला पूर आल्याने या पुरात करसपल्ली नाल्यात अडकलेल्या आठ जणांना वाचविण्यात सिरोंचा येथील आपत्ती व्यवस्थापन विभागाला यश आलंय. सिरोंचाचे तहसीलदार रमेश जसवंत नायब तहसीलदार एच.एस.सय्यद,पोलीस निरीक्षक अजय अहिरकर, नगरपंचायतचे मुख्याधिकारी विशाल पाटील सह संबंधित अधिकारी व कर्मचारी शर्थीचे प्रयत्न करून काल रात्री 8 वाजे पासून तर साडेअकरा वाजे पर्यंत बचाव कार्य सुरू ठेऊन पुरात अडकलेल्या आठ जणांचे प्राण वाचविले.
सिरोंचा येथील टुरिंग टाकीजच्या मागे कारासपल्ली नाल्याच्या पलीकडे महेंद्र रेड्डी नावाचं तेलांगनातील शेतकरी शेती करतात. सोमवरपासूनच प्राणहिता नदीला आलेल्या पुराचा प्रवाह सुरू होता.त्या शेतकऱ्याला व त्यांच्या सोबत असलेल्या मजुरांना स्थानिक प्रशासनाकडून माहिती देऊन शेती सोडून सिरोंचात पूरग्रस्त पुनर्वसन केंद्रात येण्याचे कळविण्यात आले.मात्र तो शेतकरी सिरोंचा येथील पूरग्रस्त केंद्रात आलं नव्हता.अन प्रशासनाचे ऐकत नव्हता. काल सायंकाळपासून पुराचे पाणी वाढत असल्याने रात्री आणखी दहा तास पाणी वाढण्याचे संकेत मिळाल्याने या पुरात तब्बल आठ जण अडकल्याची माहिती येथील सामाजिक कार्यकर्ते रवी सल्लम यांना नारायणपूर येथील आविस कार्यकर्ते नागराजू इंगीली,पांते मल्लांना,हरी अशोक व आदींनी माहिती दिल्यानंतर रवी सल्लम त्यांना सर्वांना सोबत घेऊन याची माहिती नायब तहसीलदार सय्यद यांना दिले.नंतर रात्री 8 वाजता तहसीलदार कार्यालयात तहसीलदार रमेश जसवंत यांना भेटून पुरात अडकलेल्यांना वाचविण्याचे विनंती केले.
यावेळी तहसिलदार,नायब तहसीलदार यांनी रात्री 8 वाजता कार्यालयात पूरस्थिती बाबत तातडीची बैठक घेतले. या बैठकीनंतर तहसीलदार ,नायबतहसीलदार व पोलीस निरीक्षक व नगरपंचायत चे मुख्याधिकारी व आपत्ती व्यवस्थापन कर्मचाऱ्यांनी पुरात अडकलेल्या आठ जणांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी बचाव कार्याला सुरुवात केली.
यावेळी आविस कार्यकर्ते नागराजू इंगीली यांनी पुरात अडकलेल्या शेतकरी महेंद्र रेड्डी यांना फोन करून प्रशासनाला सहकार्य सहकार्य करण्याचे विनंती केली. पुरात अडकलेल्या आठ जणांना बचाव पथकाने रात्री साडेअकरा वाजता त्यांना सुखरूप बाहेर काढल्याचे माहिती तहसीलदार जसवंत यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *