आपला विदर्भ

जि.प.अध्यक्ष कंकडालवार यांनी केली करंचा नाल्याची पाहणी

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क

करंचा नाल्याजवळ जावून केली पाहणी जि.प.अध्यक्ष,प.स.सभापती,जि.प.सदस्य,व पदाधिकारी
✍️अहेरी :-तालुक्यातील ग्रामपंचायत कार्यालय मरपल्ली अंतर्गत करंचा हा गाव आलापली सिरोंचा राष्ट्रीय महामार्गावरून करंचा हा गाव 25-30 कि. मी. अंतरावर दक्षिणेकडे वसले आहे या गावाची लोकसंख्या जवळपास 500 – 600 येवढी आहे.
या परिसराला दैनंदिन जीवनात नेहमीच प्रत्येक समस्येवर सामना करावा लागतो. कारण या परिसरात आरोग्य. शिक्षण. विद्युत व दळणवळण. ईत्यादी समस्यांचा सामना प्रत्येक वर्षी करावा लागतो. कारण करंचा या गावाला जाण्यासाठी हा एकमेव मार्ग आहे. आणि प्रत्येक वेळी प्रत्येक कामासाठी बाहेर चा गावाला जावसं लागतो. तालुका स्थळावर शासकीय व खासगी कामासाठी तसेच दवाखान्यात उपचारासाठी जावी लागते.
अणि त्या ठिकाणी कार्यरत असलेले प्रत्येक कर्मचारी ये जा करतात ते कर्तव्य बजावत असताना कर्मचार्‍यांना सुद्धा दळणवळण चा सामना करावा लागतो.
एक सर्वात मोठा नाला आहे. आणि पावसाळ्यात या नाला नेहमीच पाणी वाहत असतो.गेल्या पाच सहा दिवसापासून सतत पाऊस असल्याने गावातील नागरिकांना ये जा करण्यास अडचण होत आहे. सदर बाब जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्री अजयभाऊ कंकडालवार यांना माहिती होताच आज त्यांनी सदर गावाजवळील नाल्यावार जावून पाहणी केली व सम्बन्धीत अधिकार्यांना निर्देश दिले असून लवकरात लवकर नागरिकांना ये जा करण्यास सदर नाल्यावर मोठी पूल बांधकाम करून देण्यात येईल असे आश्वासन दिले असून सम्बन्धीत अधिकार्यांना तसे निर्देश दिले आहे.
*यावेळी पंचायत समिती सभापती श्री.भास्कर तलांडे,जिल्हा परिषद सदस्य श्री.अजय नैताम,प.स.सदस्य सौ.सुरेखा आलाम,श्री.अजय मिसाल ग्रा.प.सरपंच गुंडेरा, प.स.सदस्य शारदा कोरेत,हणमतू कोरेत माजी सरपंच मरपल्ली,श्रीनिवास मडावी,किस्टय्या सोयाम, बापू बेडकी,बापू तोगम, मोरेश्वर कोडगुर्ले,जिल्हा परिषदेचे कनिष्ठ अभियंता श्री.एस.आज़म श्री.रूपरेला,तिमरमचे माजी सरपंच श्री.महेश मडावी,सुरेश पोरतेट विनोद तोरेम,धर्मराज सड़मेक,इर्शाद शेख,प्रशांत गोडसेलवार,कार्तिक तोगम, व गावातील नागरिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *