आपला विदर्भ

अहेरी तालुक्यांतील पूरग्रस्त गावांना जि.प.अध्यक्ष कंकडालवार यांनी दिली भेट

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क

श्री .मा.अजयभाऊ कंकडालवार जिल्हा परिषद अध्यक्ष यांनी दिली अहेरी तालुक्यातील पुरग्रस्त गावाना भेट
प.स.सभापती,जि.प.सदस्य व महसूल,कृषि,आरोग्य विभागातील कर्मचारी उपस्थिती
✍️नुकत्याच प्राणहिता नदीला आलेल्या पुरामुळे नदी लगतची गावे व शेती पाण्याखाली आल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. याची दखल घेत शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळावी म्हणून जिल्हा परिषद अध्यक्ष श्री.मा.अजयभाऊ कंकडालवार अहेरी तालुक्यातील अबनपल्ली,व्येंकटरावपेठा, इंदाराम,मोदूनतुर्रा,देवलमरी, चीनवट्रा,आवलमारी, व्येंकटापूर कार्नेली,लकांचेन,कोलपली,
काटेपली, आदि गावातील शेतबांध्यात जावून नुकसानीची पाहणी केली.
तसेच शेतकऱ्यांशी संवाद साधून शासनाकडे पाठपुरावा करून लवकरच नुकसान भरपाई मिळवून देणार असे आश्वासन दिले.असून आजच्या दौऱ्यात महसूल विभागाचे व कृषि विभागातील कर्मचारी सोबत होते त्यांना प्रत्यक्ष नुकसान झालेल्या शेतं दाखवण्यात आले असून सर्वे करत आहेत.
यावेळी पंचायत समिती सभापती श्री.भास्कर तलांडे,जिल्हा परिषद सदस्य श्री.अजय नैताम,नायब तहसीलदार फारुख ,तालुका कृषि अधिकारी श्री.काबंंळे,इंदारामचे माजी सरपंच श्री.गुलाबराव सोयाम,श्री.संपत सिडाम माजी सरपंच,सौ.सुनंदा कोडपे सरपंच आवलमारी,उपसरपंच चिरंजीव चिलवेलवार,श्री.रवींद्र आत्राम सरपंच चिनवट्रा,कृषि सायक डोगरे साहेब,ग्राम पंचायत सदस्य कमलाबाई आत्राम,इसपत गावडे,अरुण मजरवार,शंकर आत्राम,वसंत तोरेम,विमला छटारे,कमलाबाई आत्राम,लक्ष्मीबाई मुरमाडे, खुशाल तालांडे,मारोती मडावी,व्येकना कोडापे, जगय्या परकीवार,नानाजी मुरमाडे, ग्रामसेवक ननावरे,पटवारी सचिन मडावी,पटवारी पोलमपल्ली,संजय गुड्डेवार,वासुदेव सिडाम,शंकर आत्राम,पुलय्या पोरतेट,अकुलू दुर्गे,महेश पानेम, प्रशांत गोडशेलवर,प्रकाश दुर्गे उपस्तीत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *