आपला विदर्भ

केंद्र सरकारच्या इतर मागास प्रवर्ग यादीत कापेवार जातीचे समावेश करण्याची मागणी!

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क

केंद्र सरकारचा इतर मागास प्रवर्गाच्या यादीत कापेवार जातीची समावेश करण्याची मागणी *युवा सामाजिक कार्यकर्ते साई मंदा,प्रवीण निलम सह कापेवार समाजाचे युवकांची मागणी* *जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांना कापेवार समाजाकडून निवेदन*

सिरोंचा….केंद्र सरकारच्या इतर मागास प्रवर्गाच्या यादीत अनु क्रमांक 247 वर तेलुगू कापेवार म्हणून जातीची नोंद असून कापेवार या जातीची स्वतंत्र नोंद नसल्याने याची फटका कापेवार समाजाला बसत असून केंद्र सरकारच्या इतर मागास प्रवर्ग यादीत अनु.क्र.247 वर कापेवार या जातीची सुद्धा स्वतंत्रपणे समावेश करण्यासाठी गडचिरोली जिल्हा परिषदेकडून केंद्र सरकारला शिफारस करण्यात यावी,अशी मागणी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्याकडे कापेवार समाजाचे युवा सामाजिक कार्यकर्ते साई मंदा ,प्रवीण निलम सह अनेक युवकांनी निवेदनातून केली आहे. तालुक्यातील पुरबाधित शेतकऱ्यांची पीक नुकसानीची पाहणीकरिता जि.प.अध्यक्ष कंकडालवार हे टेकडाताल्ला दौऱ्यावर आले असता कापेवार समाजाचे युवकांनी त्यांची भेट घेऊन समाजातील अडीअडचणी चर्चेद्वारे मांडून त्यांना निवेदन ही सादर करण्यात आले. कापेवार समाजाचे युवकांनी जि.प.अध्यक्ष कंकडालवार यांना दिलेल्या निवेदनात,राज्यात व जिल्ह्यात कापेवार समाज मोठ्या संख्येने असून केंद्र सरकारच्या इतर मागास प्रवर्गात जातीची स्वतंत्रपणे समावेश नसल्याने शालेय प्रवेशापासून तर नोकरी व सरकारची योजनांची फायदा घेण्यासाठी अडचणीचे ठरत असून अनु क्रमांक 247 वर तेलुगू कापेवार पाठोपाठ कापेवार या जातीची सुद्धा स्वतंत्रपणे समाविष्ट केल्यास समाजला न्याय मिळणार म्हणून जिल्हा परिषदेकडून केंद्र सरकारकडे शिफारशी करून कापेवार समाजाला योग्य न्याय मिळवून मागणी समाजाचे युवकांनी केली आहे.जि.प.अध्यक्ष कंकडालवार यांना निवेदन देतांना साई मंदा यांच्यासोबत प्रवीण निलम, राजशेखर तंनिर,स्वप्नील पेद्दी,विजयकुमार गादे,रमेश निलम,मुकेश कासेट्टी सह अनेक युवक उपस्तीत होते..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *