आपला विदर्भ छत्तीसगड ताज्या घडामोडी तेलंगणा देश महाराष्ट्र मुलाखत राशिभविष्य रोजगार वार्ता संपादकीय

स्वतंत्र भारतातील प्रजासत्ताक दिनाची पहिली परेड कुठे झाली माहितीय का?

नवी दिल्ली : देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून दरवर्षी प्रजासत्ताक दिनानिमित्त राजपथावर जंगी कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं. या कार्यक्रमानिमित्त राजपथावर भारताची सांस्कृतिक परंपरा, विविध क्षेत्रातील योगदान, तसेच देशाच्या सामर्थ्याचं दर्शन संपूर्ण जगाला घडवलं जातं.

पण स्वतंत्र भारतातील पहिला प्रजासत्ताक दिन कुठे झाला? असा प्रश्न विचारला, तर याचं उत्तर अनेकांना माहिती नसतं. पण आज आम्ही तुम्हाला याची माहिती देणार आहोत.

26 जानेवारी 1950 रोजी देशाचा पहिला प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. पण हा प्रजासत्ताक दिन राजपथावर नव्हे, तर इर्विन स्टेडियम ( सध्याचं नॅशनल स्टेडियम)वर झाला. विशेष म्हणजे, 1950 ते 1954 पर्यंत प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम इर्विन स्टेडियम, किंग्सवे, लाल किल्ला, रामलीला मैदान आदी ठिकाणी झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *