आपला विदर्भ छत्तीसगड ताज्या घडामोडी तेलंगणा देश महाराष्ट्र मुलाखत राशिभविष्य रोजगार वार्ता संपादकीय

अंजली तेंडुलकर अहमदनगरच्या शेतकऱ्यांमध्ये, सेंद्रिय शेतीला भेट

हमदनगर : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर सामाजिक उपक्रमात अग्रेसर आहे. आपल्या खासदार निधीतून त्याने अनेक ठिकाणी निधी दिलाय. मात्र त्याची पत्नी अंजली तेंडुलकर यांनीही त्याच्या पावलावर पाऊल टाकलं आहे. अंजली यांनी अहमदनगर जिल्ह्यातील सेंद्रिय शेतीची पाहणी करुन शेतकर्‍यांच्या मदतीसाठी हात पुढे केला. अंजली यांच्या स्नेही क्लिया इथे सेंद्रिय शेतीचा प्रचार आणि प्रसार करत आहेत.

अंजली यांनी दुसर्‍यांदा अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील भट्टेवाडीला भेट देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला. शेतात सुरु असलेला संवाद…. पिकांची पाहणी… शेतकऱ्यांशी चर्चा… परस बागेची माहिती आणि पशुधनाची काळजी… हे सारं पाहिल्यावर आपल्याला कदाचित कृषी खात्याचा दौरा वाटेल. मात्र अंजली तेंडुलकर यांची सेंद्रिय शेतीला दिलेली ही भेट आहे. पाच ते सहा तास थांबून त्यांनी पिकांची माहिती घेतली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *