अहेरी तालुका

आलापल्ली येथे माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम उत्साहात संपन्न*

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क

अहेरी :

आल्लापल्ली येथे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या वाढदिवस आलापल्ली शहरात विविध ठिकाणी मोठया उत्साहात पार पडला. अजयभाऊ कंकडालवार यांची प्रमुख उपस्थित जिल्हा परिषद मुलींच्या शाळेतील विध्यार्थी विध्यार्थिनींना नोटबुक व पेन चॉकलेट वाटप करण्यात आली आहे.तसेच सफाई कामगार महिलांना अजयभाऊ यांच्या शुभ हस्ते साडी वाटप आणि मतिमंद निवासी शाळेत विध्यार्थी विध्यार्थिनींना स्कुलबॅग व नोटबुकपेन वाटप करण्यात आले.यावेळी आविसं व अजयभाऊ मित्र परिवारचे अनेक पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत अजयभाऊ यांचं जनसंपर्क कार्यालयात केक कापून वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आली.

यावेळी अहेरी पंचायत समिती माजी सभापती भास्कर तलांडे, किष्टपूर ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच अशोक येलमुले,माजी जि.प.सदस्य अजय नैताम,आलापल्ली ग्रामपंचायतचे सदस्य सुगंधा मडावी,अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार नागेपाल्ली ग्रामपंचायत सरपंच लक्ष्मण कोडापे,सुमनताई खोब्रागडे,भाग्यश्री बेज्जलवार, शरदा कडते,रजनी गंजीवार उषा आत्राम,पुष्पा जगताप,मदनांन मामू,सैदभैया,अमित येनप्रेड्डीवार,पुणेश कंदीकुरवार,सचिन रामगोनवार प्रमोद गोडसेलवारसह आविसं व अजयभाऊ मित्र परिवारचे पदाधिकारी,कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close