अहेरी तालुका

जि.प.माजी अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते किष्टापूर येथील नवीन वर्ग खोलीचे लोकार्पण संपन्न..!

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क

अहेरी : तालुक्यातील वांगेपल्ली ग्राम पंचायत अंतर्गत येणाऱ्या किष्टापुर(वा) येथे शालेय विद्यार्थ्यांसाठी वर्ग खोली नसल्याने शिक्षण घेण्यासाठी अडचण भासत होती. ही बाब वांगेपल्ली येथील सरपंच दिलीप मडावीसह येथील पालक व नागरिकांनी माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांची अहेरी येथील त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात भेट घेऊन नवीन वर्ग खोली मंजूर करण्याची मागणी केली होते.

या रास्त मागणीची दखल घेत जि.प.माजी अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी जिल्हा परिषदेच्या जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत सन 2021-22अंतर्गत किष्टापूर येते जिल्हा परिषद शाळेसाठी नवीन वर्ग खोली मंजूर करून दिले होते.या नवीन वर्ग खोलीची बांधकाम पूर्णत्वास आल्याने या नवीन वर्ग खोलीची लोकार्पण माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते करण्यात आला .या कामाप्रति वांगेपाल्ली येथील नागरिकांनी अजयभाऊंची आभार मानत समाधान व्यक्त केले.

या लोकार्पण सोहळ्याला सरपंच दिलीप मडावी,ग्रामपंचायत सदस्य कल्पनाताई मडावी,नरेंद्र गर्गम,संतोष येरमे,केंद्र प्रमुख चीलवेलवार सर,राहुडकर सर,चलकेलवार मॅडम,कारेंगुलवार मॅडम,पोषालू भोयर,यशवंत मडावी,बालाजी आलाम,बाबूराव नागपुरे,दिलीप पिपरे,महेश नैताम,प्रमोद गोडशेलवार,व्यंकटेश कासंगटुवार,गणेश मडावी,सोमा नैताम,राकेश सडमेकसह आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे कार्यकर्ते व शाळेचे शिक्षकवृंद तसेच प्रतिष्ठित नागरिकांसह पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close