गडचिरोली जिल्हासिरोंचा तालुका

भारनियमन मुक्तेतेसाठी सिरोंचा तालुक्यातील आठ गावातील शेतकऱ्यांनी गाठले जिल्हा मुख्यालय

विदर्भक्रांती न्यूज नेटवर्क

सिरोंचा...सिरोंचा तालुक्यातील नारायणपूर,मेडारम,आदीमुत्तापुर,नंदिगाव, लक्ष्मीपूर,तिगलगुडम,मर्रीगुडम आणि तमंदाला या आठ गावातील शेतकऱ्यांनी चक्क जिल्हा मुख्यालय गाठून भरनियमांनातून मुक्ती करण्याची मागणी संबंधित अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. वीज वितरण कंपनीकडून तालुक्यातील आठ गावांमध्ये जणूकाही अघोषित भारनियमन सुरू केल्याने शेतीला लागणाऱ्या आवश्यक वीज पुरवठा अभावी शेतकऱ्यांची उभी पिके नष्ट होत आहे. अतिवृष्टी, महापूर या संकटाने हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांपुढे महावितरणचे भारनियमन हे खूप मोठं संकट बनून उभे आहे.भारनियमन पूर्णतः बंद करून चोवीस तास शेतीला वीज पुरवठा करण्याची मागणी या आठ गावातील शेतकऱ्यांकडून नेहमी होत असले तरी यात संबंधित विभागाने हात झटकल्याने अखेर शेतकऱ्यांनी नाईलाजास्तव जिल्हा मुख्यालय गाठून जिल्हाधिकारी व अधीक्षक अभियंता गडचिरोली यांना निवेदन देऊन भारनियमनातून आठ गावांची मुक्तता करण्याची आर्त मागणी केली आहे. सिरोंचा तालुक्यातील आठ गावातील शेतकऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात,AG विद्युत लाईन सुरळीत सुरू करण्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्याकडे वीज वितरण कंपनीला देय असलेली थकीत वीज बिले ही पूर्ण भरले,वीज देयके पूर्ण भल्यानंतर ही भारनियमन सुरू ठेवल्याने शेतकऱ्यांमध्ये वीज वितरण कंपनी व सरकरप्रति तीव्र नाराजगी पसरलेली आहे.वीज वितरण कंपनीच्या या अघोषित भारनियमनामुळे आठ गावातील शेतकऱ्यांची शेकडो हेक्टरवरील उभी पिके नष्ट होत असल्याने भारनियमन बंद करण्यात यावी या मागणीसाठी आठ गावातील शेतकरी नारायणपूर (कारसपल्ली)येथे वीज वितरण कंपनी विरोधात चक्काजाम आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली आहे. सिरोंचा तालुक्यातील आठ गावातील शेतकऱ्यांनी लोडशेडिंग बंद करण्यात यावी म्हणून जिल्हाधिकारी व अधीक्षक अभियंता वीज वितरण कंपनी यांना गडचिरोलीचे खासदार अशोक नेते,माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कांकडालवार, आमदार डॉ.देवराव होळी,आमदार रमेश गजबे, भाजप युवा नेते संदीप कोरेत या पदाधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्तीतीत वेंकन्ना भीमकरी,पांते मल्लय्या,अशोक इंगीली,नागराजू इंगीली,मधुकर इंगीली,अशोक हरी,आनंदराव रापेल्ली,स्वामी नुसेट्टी,दुर्गय्या तोंबेरा,मोरे मारांन्ना,राजबाबू नुकूम,संपत दाया, किष्टय्या कडेकरी,एम्पेल्ली शेखर,प्रशांत चम्मकारी,वेंकटेश कडेकरी,चंद्रशेखर चम्मकारी,राकेश कडेकरी,राजबाबू पांते, संपत हरी,सत्यम ठाकूर,गणपती ठाकूर,सारली येलपुला,मदनय्या जिल्लपल्ली,प्रशांत चेंमकरी,रेवंतरेड्डी आदी शेतकऱ्यांनी निवेदन सादर केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close