आल्लापल्ली येथील लोकसेवा फाऊंडेशनच्या वतीने स्मशानभूमीत स्वच्छता अभियान

विदर्भक्रांती न्यूज नेटवर्क
आल्लापल्ली
*माजी आमदार दिपक दादा आत्राम यांचे लाभले सहकार्य* *आल्लापल्ली* येथील आदिवासी लोकसेवा फाऊंडेशनचे पदाधिकारी व प्रतिष्ठित नागरिक स्वामी वेलादी,उमेश आत्राम,शंकर शिडाम यांनी आविस नेते व माजी आमदार दिपक दादा आत्राम यांची भेट घेऊन येथील आदिवासी समाजासाठी असलेल्या स्मशानभूमीत पसरलेल्या सुबाभूळ व काटेरी झाडांचे समस्या त्यांच्यासमोर मांडले. स्मशानभूमी परिसरातील सुबाभुळ व काटेरी झाडांमुळे एखाद्याचं अंत्यविधी कार्यक्रम पार पाडणेही कठीण जात होते.
येथील आदिवासी लोकसेवा फाऊंडेशनच्या पदाधिकारी व प्रतिष्ठित नागरिकांनी माजी आमदार दिपक दादा आत्राम यांच्याकडे मांडलेल्या समस्याची दखल घेत त्यांनी स्वखर्चाने जेसीबी व मजुरांना लावून स्मशानभूमीचे संपूर्ण परिसर स्वच्छता करून दिले. स्मशानभूमी स्वच्छतेच्या वेळी आदिवासी लोकसेवा फाऊंडेशनचे पदाधिकारी आदिवासी समाजाचे प्रतिष्ठित व्यक्ती ईश्वर वेलादी, शंकर शिडाम, मधुकर मेश्राम, गंगाराम कोरेत, माजी सरपंच विजय कुसनाके,कोष समिती अध्यक्ष स्वामी वेलादी, उमेश आत्राम,प्रकाश कोरेत,राजू आत्राम,मांतेश मेश्राम,सिनू कन्नाके,नागेश मेश्राम, सचिन शिडाम,दिपक मेश्राम, सुरज मडावी,संदीप मेश्राम, विशाल आत्राम,अमित शिडाम,सुरज मेश्राम, आतिष कुमरे, सिंधू आत्राम,तसेच प्रतिष्ठित महिला मंडळाचे सुमनबाई शिडाम,चंद्रकला मेश्राम,ग्रा.पं.सदस्या मायाताई कोरेत, कल्पनाताई उरेत, वाच्छलाबाई मडावी आदी उपस्तीत होते.