सिरोंचा तालुका

गर्कापेठा येथील दारू विक्रेत्यांविरुद्ध पोलिसांची धडक मोहीम

विदर्भक्रांती न्यूज नेटवर्क …सिरोंचा

गडचिरोली : सिरोंचा तालुक्यातील गर्कापेठा येथील विक्रेत्यांविरोधात धडक मोहीम राबवत 29 हजार 500 रुपयांची दारू जप्त केल्याची कारवाई बामणी पोलिस, मुक्तीपथ व गाव संघटनेने संयुक्तरित्या केली. याप्रकरणी दोन विक्रेत्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गर्कापेठा येथे गाव संघटनेच्या अथक प्रयत्नातून मागील दिड वर्ष अवैध दारूविक्री बंद होती . मात्र, मागील चार महिन्यांपासून काही नवीन विक्रेत्यांनी दारूचा अवैध व्यवसाय सुरू केला. सदर विक्रेते रंगयापल्ली, कोट्टा माल, कोट्टा पॅच, वियमपल्ली, रायपेठा आदी गावातील किरकोळ विक्रेत्यांना दारू पुरवठा करतात. गावांमध्येही दारूच्या व्यसनाचे प्रमाण वाढले होते. अशातच अहिंसक कृतीचे नियोजन करण्यात आले. त्यानुसार बामणी पोलिस,गाव संघटना व मुक्तीपथ तालुका चमूने गावातील 17 विक्रेत्यांच्या घराची तपासणी केली. यावेळी 7 जणांच्या घरातून 20 ड्रम गुळाचा सडवा, विदेशी दारू असा एकूण 29 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. याप्रकरणी दोन विक्रेत्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई बामणी पोलिस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी मस्के यांच्या नेतृत्वात पोलिस पथकाने केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close