बिझनेस

वर्क फ्रॉम होमचा वैताग; या क्षेत्रातील कर्मचारी ऑफिसात जाण्यासाठी उत्सुक

लॉकडाऊन सुरू झाल्यापासून बहुतांश कर्मचारी वर्क फ्रॉम होम करत आहेत. पण याच वर्क फ्रॉम होमचा कर्मचाऱ्यांना आता कंटाळा आला असल्याचं चित्र आहे. लिंक्डइनने हा अहवाल तयार करण्यासाठी १ जून ते २६ जुलै या काळात देशातील ५,५५३ व्यावसायिक कर्मचाऱ्यांना प्रश्न विचारले.

मालहाताळणी (लॉजिस्टिक्स), माहिती तंत्रज्ञान (इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी अर्थात आयटी) आणि प्रसारमाध्यमे या क्षेत्रांत काम करणाऱ्यांमध्ये प्रत्यक्ष कार्यालयांत जाऊन काम करण्याविषयी उत्सुकता वाढत असल्याचे निरीक्षण एका सर्वेक्षण अहवालात मांडण्यात आले आहे. हे सर्वेक्षण लिंक्डइन या संस्थेने केले आहे.

लिंक्डइनने आपल्या सर्वेक्षणातून ‘लिंक्डइन वर्कफोर्स कॉन्फिडन्स इंडेक्स’ अहवाल तयार केला आहे. हा अहवाल दर १५ दिवसांनी तयार केला जातो. या अहवालानुसार, पर्यटन व आतिथ्य क्षेत्रातील कर्मचाऱ्यांपैकी ४६ टक्के कर्मचारी, तर ग्राहकोपयोगी वस्तू उद्योगातील कर्मचाऱ्यांपैकी ३९ टक्के कर्मचारी परवानगी मिळताच कार्यालयांत जाऊन काम करण्यास उत्सुक आहेत. मात्र सॉफ्टवेअर आणि आयटी उद्योगांतील दोन कर्मचाऱ्यांपैकी एकाने आपण आता घरून काम करण्याची पद्धत स्वीकारली असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे याच पद्धतीने यापुढेही काम करण्यास आपण तयार आहोत, असेही या कर्मचाऱ्यांनी सांगितले आहे.

लिंक्डइनने हा अहवाल तयार करण्यासाठी १ जून ते २६ जुलै या काळात देशातील ५,५५३ व्यावसायिक कर्मचाऱ्यांना प्रश्न विचारले. यातून अनेक कर्मचाऱ्यांनी कार्यालयांत जाऊन काम करण्याची तयारी दाखवली. त्याचवेळी अनेकांनी कार्यालयांत जाण्याबद्दल सावध पवित्रा घेतला आहे.

या सर्वेक्षणातून प्रत्येक प्रतिसादकर्ता कर्मचारी वैयक्तिक आर्थिक गुंतवणूक व बचत यांबाबत सतर्क असल्याचे स्पष्ट झाले आहे. पुढील सहा महिन्यांत घरून काम करत असल्यामुळे वैयक्तिक बचत वाढेल, असे मत प्रत्येक तीन कर्मचाऱ्यांतील एकाने व्यक्त केले, तर ही बचत पूर्वीप्रमाणेच राहील, असे प्रत्येक पाच कर्मचार्यांपैकी तिघांनी सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close