Games

मल्लेरा येथे न्यू-यंगस्टार क्लब कडून कबड्डी स्पर्धेचे आयोजन

विदर्भाक्रांती न्यूज नेटवर्क मूलचेरा

*न्यू-यंग स्टार कबड्डी क्लब मल्लेरा येते आयोजित कबड्डी स्पर्धेचे उदघाटन
जि.प.अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते उदघाटन
✍️ मुलचेरा तालुक्यातील अतिदुर्गम भागात असलेल्या मल्लेरा येते न्यू-यंग स्टार कबड्डी क्लब यांच्या वतीने भव्य खुले वजन गट (60 K. G.) मल्लेरा मंडळ तर्फे भव्य कबड्डी स्पर्धेच्या आयोजन करण्यात आले होते.
सदर क्रिडा स्पर्धेसाठी पहिला,दूसरा व तिसरा असे तीन पुरस्कार या ठिकाणी देण्यात येणार आहे.
आज सदर स्पर्धेचे उदघाटन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मल्लेरा ग्रामपंचायत चे सरपंच श्री.अरुण कडते होते.
तर प्रमुख पाहुणे म्हणून अहेरी पंचायत समितीचे सभापती श्री.भास्कर तलांडे,जिल्हा परिषद सदस्य श्री.अजय नैताम, पोलीस पाटील देवाजी ओडिनालवार ,नामदेव दुर्गे,विनायक राजुलवार,रामेश्वर तोरे ग्रा.प.सदस्य (मल्लेरा), रेकणकर गर्तुलवार ग्रा.प.(सदस्य),शांतिग्राम चे उपसरपंच कमल बाला, श्रीकांत समजदार,दिनेश मडावी,सतीश पोरतेट आदि मान्यवंर मंचावर उपस्थिति होते.

सदर कार्यक्रमाप्रसंगी जि.प.अध्यक्ष यांनी मार्गदर्शन करतांना म्हणाले सदर गांवात अनेक अडचणी आहेत,मी अध्यक्ष झाल्यापासून दुसर्यांदा या गांवात आलो आहे,या गावासाठी जि.प.मधून या परिसरातील समस्या बाबत सखोल अशी मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे प्रस्थाविक श्री.प्रभाकर मरापे यांनी केली, तर संचालन श्री.सतीश पोरतेट यांनी केली.
यावेळी मंडळचे अध्यक्ष गोपीनाथ वेलादी, प्रभाकर मरापे,उपाध्यक्ष-नितेश कुसनाके,सचिव-सोनू तुनकालवार,सहसचिव-वीरेंद्र तुनकालवार क्रीडा प्रमुख दिगंबर मरापे,रमेश तुनकालवार व महिला पुरुष व युवक उपस्थित होते.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close