सामाजिक

मेडिगड्डा प्रकल्प बाधित शेतकऱ्यांच्या सुनावणी बैठकीला माजी आमदार दिपकदादा आत्राम यांची उपस्थिती!

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क… तेलंगणा सरकारच्या बहुचर्चित मेडिगड्डा -कालेश्वर सिंचन प्रकल्पामुळे सिरोंचा तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचे मागील तीन वर्षांपासून त्यांचे पिकांचे अतोनात नुकसान होत असून प्रकल्पकडून भूमीसंपदान प्रक्रिया न राबविल्याने बाधित शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरले होते .याची दखल घेत अहेरीचे उपविभागीय अधिकाऱ्यांनी प्रकल्पाचे अधिकाऱ्यांसंमवेत येथील तहसील कार्यालयात बाधित शेतकऱ्यांची सुनावणी बैठक बोलाविली होती. या सुनावणी बैठकीला आविस नेते व माजी आमदार दिपक दादा आत्राम यांनी हजेरी लावून बैठकीला उपस्तीत अधिकाऱ्यांसमोर प्रकल्प बाधित शेतकऱ्यांची भक्कमपणे त्यानी बाजू मांडले.यावेळी माजी आमदारांनी अधिकाऱ्यांसोबत अर्धा तास तालुक्यातील विविध समस्यांवर ज्वलंत समस्या उपविभागीय अधिकाऱ्यांसमोर मांडले.

सुनावणी बैठकीला माजी आमदार आत्राम यांचे समवेत कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आकुला मल्लिकार्जुनराव, आविस अध्यक्ष बानय्य जनगम,माजी सरपंच विजय कुसनाके,न. पं. उपाध्यक्ष बबलू पाशा,आविस सल्लागार रवी सल्लम, बांधकाम सभापती नरेश अलोने,जुलेख शेख,सरपंच अजय आत्राम,पत्रकार तिरुपती चिटयाला,मारोती गणापूरपू,साई मंदा सह पदाधिकारी व कार्यकर्तेगण उपस्तीत होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close