मूलचेरा तालुकासामाजिक

कोपरअल्ली येथील नागरिकांच्या मदतीला धावून आले माजी आमदार दिपक दादा आत्राम

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क

मूलचेरा….तालुक्यातील कोपरअल्ली येथील शेतकरी ,शेतमजूर व सर्वसामान्य नागरिकांचे मागील काही महिन्याचे घरगुती वीज मिटरचे बिल भरणे वीज वितरण कंपनीकडे थकीत होते. येथील नागरिकांनी वीज वितरण कंपनीला थकीत असलेले वीज बिल न भरल्याने संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी गावातील अनेकांचे घरगुती वीज मिटरचे कनेक्शन कापण्यासाठी गावात गेले होते.
सध्या कोपरअल्ली गावात सगळीकडे धान मळणी व कापूस वेचणीचे काम सुरू असून धान व कापूस न विकल्याने घरगुती मिटरचे वीज बिल भरण्यासाठी कोणाच्याही हातात पैसे नसल्याने काही दिवस का होईना पण वीज कनेक्शन कापू नये म्हणून गावकऱ्यांनी आविसं नेते व माजी आमदार दिपक दादा आत्राम यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून सदर समस्या त्यांच्याकडे मांडले. आज आविस नेते व माजी आमदार हे मूलचेरा तालुका दौऱ्यावर होते. दौऱ्यावर असतांनाच त्यांना कोपरअल्ली येथील थकित वीज बिल धारकांनी भ्रमणध्वनी वरून घरगुती विद्युत मिटरचे थकित बिलाविषयी त्यांच्याकडे समस्या मांडल्याने त्यांनी मूलचेरा तालुक्याचे दौरा अर्ध्यावरती सोडून चक्क कोपरअल्ली गाठून गावकऱ्यांची समस्या ऐकून त्यांनी वीज कापनीसाठी आलेल्या वीज वितरण कंपनीचे अधिकारी व कर्मचाऱ्यांसोबत चर्चा करून वीज बिल थकीतदारांची समस्या नीटपणे त्यांना समजावून सांगून वीज बिल भरण्यासाठी त्यांना काही दिवस अवधी देण्याचे विनंती केले.तसेच या विषयी वीज वितरण कंपनीचे वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत ही भ्रमणध्वनी वरून संपर्क करून त्यांना ही येथील घरगुती मिटरचे वीज न कापन्याचे विनंती केले असता माजी आमदार आत्राम यांच्या विनंतीला मान देऊन संबंधित अधिकाऱ्यांनी कोपरअल्ली येथील थकित वीज बिल धारकांचे घरगुती वीज मिटरचे विद्युत कनेक्शन न कापता वीज बिल भरण्यासाठी त्यांना अवधी दिल्याने माजी आमदार दिपक दादा आत्राम यांच्या याकामाप्रति त्यांनी समाधान व्यक्त केले. आविस नेते व माजी आमदार दिपक दादा आत्राम हे वीज वितरण कंपनीचे अधिकारी व कर्मचाऱ्यांसोबत चर्चा करीत असतांना कोपरअल्ली येथील माजी उपसरपंच रवी झाडे, गुलाब कोबरे, सुधाकर येलमुले, गजानन नैताम,मिथुन कुळमेथे, शंकर रामटेके, वागू पुल्लीवार, दौलत आत्राम, मिलिंद अलोने, सतीश पोरतेट आदी उपस्तीत होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close