सामाजिक

माजी जि.प.अध्यक्ष कंकडालवार यांच्याकडून लिंगमपल्ली येथील पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचे किट्स वाटप

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क

अहेरी:-अहेरी तालुक्यांतील रेपनपली ग्राम पंचायत अतंर्गत येत असलेल्या अतिदुर्गम लिंगमपली येते दरवर्षी पूर येत असतो यावर्षी पण पूर आल्याने पुराचा पाण्यात घरातील जीवनावश्यक वस्तू वाहून गेले होते.सदर गावाला भेट देवून नागरिकांशी चर्चा करणयात आले असतात नागरिकांकडुन विनंती करण्यात येत होती कि सदर गांवात दरवर्षी पूर येत असतो त्यामुळे प्रशासनाने सदर गावांच्या पुनर्वसन करण्यात यावी अशी मागणी करत होते.सदर गांवात पूर परिस्थिती निर्माण झाली त्यावेळी अनेक लोकप्रतिनिधी व संस्थानाकडून मदत केली आहे. सतत चालू असलेल्या पावसामुळे हाताला काम नसल्यामुळे उपासमारीची पाळी उदधबवू नये म्हणून माजी जिल्हा परिषद अध्यक्ष मा.अजयभाऊ कंकडालवार यांनी सदर गांवात पूर पिडीत नागरिकांना जीवनावश्यक असलेले किट वाटप करण्यात आले.
यावेळी अहेरी पंचायत समितीचे माजी सभापती श्री.भास्कर तलांडे,माजी जिल्हा परिषद सदस्य श्री.अजय नैताम,माजी पंचायत समिती सभापती सौ.सुरेखा आलाम,रेपनपलीचे सरपंचा सौ.लक्ष्मी मडावी,कमलापूरचे सरपंच श्रीनिवास पेंदाम,उपसरपंच श्री.सचिन ओल्लेटीवार,राजारामचे माजी सरपंच सौ.जोतीताई जुमानके,माजी उपसरपंच श्री.संजय पोरतेट,माजी उपसरपंच श्री.मोंडी लेंनगुरे,ग्राम पंचायत सदस्या सौ.सपना तलांडे,प्रिया पोरतेट,विलास बोरकर,दासु काम्बडे,गंगाराम मडावी,माधव कूड़मेथे,दिपक अर्का,नारायण चालुरकर,जितेंद्र पंजलवार,नरेंद्र गरगम,प्रमोद गोडसेलवार,गुलाब देवगडे,लक्ष्मण जनगाम,सोहनलाल चापले,वासुदेव सिडाम,वसंत नेरला,सीताराम नेरला,बाजीराव सिडाम,व गावातील नागरिक उपस्थित होते.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close