दामारांचा येथील आविस ग्रा.पं.सदस्य व कार्यकर्त्यांच्या रा.काँ.मध्ये प्रवेश झाल्याची बातमी चुकीची

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क
स्थानिक आमदा
रांनाकडे समस्या घेवुन गेल्यावर प्रवेश दाखव
लयाची ग्रा.प.सदस्य श्री.सम्मा
कुरसाम
यांची स्पष्टीकरण
अहेरी तालुक्यातील ग्रामपंचायत दामरंचा येथील आविस चे ग्रामपंचायत सदस्य श्री साम्मा पडगा कुरसाम आणि आविस चे कार्यकर्ते श्री ईरीया ईरपा कुळमेथे, श्री मासा पेंटा सिडाम, वसंत गणपत कुरसाम इत्यादींनी आदिवासी विद्यार्थी संघाला सोडून,
अहेरी विधान सभा क्षेत्राचे आमदार माननीय श्री धर्मराव बाबा आत्राम साहेब यांच्यावर विश्वास टेवुन, आमदार श्री बाबा आत्राम साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दुपट्टा टाकून प्रवेश दाखवण्यात आले असून वर्तमानपत्र बातमी प्रकाशित करण्यात आले होते.
मात्र आज दामरंचा ग्राम पंचायतचे सदस्य श्री.सम्मा कुरसाम यांनी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांची भेट घेवुन स्पष्ट केले कि,मी आपल्या क्षेत्राचे आमदार म्हणून त्यांच्याकडे आम्हाच्या समस्या घेवुन गेलो होतो मात्र त्यांनी मला व माझ्या सहकाऱ्यांना दुपट्टा टाकून प्रवेश दाखवले हे चुकीचा असून मी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या नेत्रुत्वात आदिवासी विध्यार्थी संघटने मध्येच आहो.अशी स्पष्टीकरण दिले आहे.
आज जिल्हा परिषद अध्यक्ष यांच्या निवासस्थानी घडलेली आपबीती सांगितल असून संघटनेसाठीच कार्य करतो असे सांगितले यावेळी अहेरी पंचायत समितीचे माजी सभापती श्री.भास्कर तलांडे,माजी जिल्हा परिषद सदस्य श्री.अजय नैताम,अहेरीचे नगरसेवक श्री.प्रशांत गोडसेलवार,दामरंचाचे माजी सरपंच श्री.जिलकरशाह मडावी,इंदारामचे माजी सरपंच श्री.गुलाबराव सोयाम,आविसचे कार्यकर्ते प्रमोद कोडापे, विनोद दूनालावार,पोदा वेलादी,दशरू सिडाम,आलापलीचे माजी ग्राम पंचायत सदस्य श्री.सलीम शेख,नरेंद्र गरगाम,राकेश सड़मेक,इत्यादी उपस्थीत होते.