राजकिय

राज्य सरकार विरुद्ध काँग्रेसकडून शिवणी येथील शेतबांध्यावर मुंडन आंदोलन !

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क… गडचिरोली

यावर्षी जुलै व आगष्ट मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे आणि गोसिखुर्द व मेडिगड्डा धरणातील अति पाण्याचा विसर्गाने जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली.आणि दुबार -तीबार पेरणीचे संकट जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर आले.अनेक शेतकऱ्यांवर कर्जाचे डोंगर कोसळले.जिल्ह्यातील शेतकरी कधी नव्हे तर आत्महत्या करू लागले.तरीही निद्रा अवस्थेत असलेल्या राज्य सरकार शेतकऱ्यांना आश्वासनाच्या पलीकडे काहीच देऊ शकले नाही. राज्य सरकारच्या निषेध करण्यासाठी व जिल्हा ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत देण्यात यावी,यासाठी गडचिरोली तालुक्यातील शिवणी येथील शेतबांध्यावर काँग्रेस पक्षाकडून 6 सप्टेंबर मंगळवारला मुंडन आंदोलन करण्यात येईल,अशी माहिती जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी कळविले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close