रेपनपल्ली येथील वैयक्तिक वनहक्क दाव्यांचे संदर्भात चर्चा
विदर्भक्रांती न्यूज नेटवर्क…अहेरी…
जि.प.माजी अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या निवासस्थानी.
📝 दिनांक ०९/०९/२०२२ रोजी अहेरी तालुक्यातील मौजा – रेपनपली येथे सण २००५ पुर्वी अतिक्रमण केलेले शेतकऱ्यांना वनविभागाकडून जीपी आर एस नकाशा देत आहेत मात्र नकाशा सत्यप्रतित देत नाहीत त्यामुळे अडचण निर्माण होत होती.त्यामुळे आज रेपनपली येतील वन हक्क धारक माजी जिल्हा परिषद अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या भेट घेवून यांबाबत सविस्तर चर्चा केली.तेंव्हा मा.अध्यक्ष साहेब यांनी तोडगा काढण्यात येईल म्हणून सांगितले.यानंतर तुम्हाला पुन्हा अर्ज करण्याची संधी मिळेल याची काही गॅरंटी नाही. असे म्हणाले तसेच वैयक्तीक वन हक्क दाव्याचे अर्ज कसा भरायचे हे सुध्दा शेतकऱ्यांना समजावून संगण्यात आला.
यावेळी अहेरी पंचायत समितीचे माजी सभापती श्री.भास्कर तलांडे, माजी जि.प.सदस्य श्री.अजय नैताम,व रेपनपली येतील कार्यकर्ते उपस्थित होते.