गडचिरोली जिल्हासामाजिक

पंदेवाही येथील महिलांची रोजगारासाठी माजी आमदार दिपक दादा आत्राम यांना दिले निवेदन

विदर्भक्रांती न्यूज नेटवर्क …एटापल्ली …

पंदेवाही येथील महिलांची रोजगारासाठी माजी आमदार दिपक दादा आत्राम यांना दिले निवेदन

एटापल्ली….तालुक्यातील पंदेवाही येथील सुशिक्षित बेरोजगार महिलांनी आविसं नेते व माजी आमदार दिपक दादा आत्राम यांची एटापल्ली येथे भेट घेऊन रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी सरकारला पाठपुरावा करण्याची निवेदन देण्यात आली. आविस नेते व माजी आमदार आत्राम हे एटापल्ली दौऱ्यावर आले असता पंदेवाही येथील महिलांनी स्थानिक विश्रामगृहात त्यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. महिलांनी दिलेल्या निवेदनात,अतिवृष्टीमुळे संपूर्ण शेतीचे नुकसान झाली असून दुबार-तिबार पेरणीचे संकट येऊन आहे.शेतीशिवाय रोजगाराचे साधन उपलब्ध नसल्याने उपासमारीची पाळी आली आहे. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसान भरपाईसह रोजगार उपलब्ध करून देण्यात यावी,असेही नमूद आहे. यावेळी माजी आमदारांनी उपस्तीत महिलांना अतिवृष्टी चे नुकसान भरपाई सह रोजगार मिळवून देण्यासाठी सरकारकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. पंदेवाही येथील महिलांनी माजी आमदार आत्राम यांना निवेदन देतांना, माजी जिल्हा परिषद सदस्य कारूजी रापंजी,संजुभाऊ चरडुके,आविस तालुका उपाध्यक्ष श्रीकांत चिप्पावार, रमेश तोरे, माजी सरपंच दिलीप गंजीवार,विजय कुसनाके,जुलेख शेख आदी उपस्तीत होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close