सिरोंचा येथील आंतरराज्य बसस्थानकाची बांधकाम अर्धवटच !

विदर्भक्रांती न्यूज नेटवर्क ….रवी सल्लम सिरोंचा.
सिरोंचा…..गडचिरोली जिल्ह्याचं दक्षिण टोकावर वसलेल्या सिरोंचा येथील आंतरराज्य बसस्थानकाची बांधकाम मागील दोन वर्षांपासून अर्धवट अवस्थेतच आहेत.परिणामी तीन राज्यातील प्रवाश्यांना बसस्थानक परिसरात असलेल्या झाडांच्या सावलीचा आधार घ्यावं लागतं आहे.
सिरोंचा शहराला तेलंगणा व छत्तीसगड हे दोन्ही राज्य लागून आहे .येथे नेहमी दोन्ही राज्यातील प्रवाश्यांची वर्दळ असतात. मागील भाजप -शिवसेना या युती सरकारने प्रवाश्यांच्या सोयींसाठी आंतरराज्य बसस्थानक मंजूर केले. बसस्थानक बांधकामाची भूमिपूजन ही मोठया थाटात पार पडला.काही दिवस बांधकाम ही सुरू होते मात्र कोरोनाच्या काळात बांधकाम बंद ठेवण्यात आला होता.माशी कुठे शिंकली मात्र माहीत नाही,आजच्या घडीलाही बांधकाम अर्धवटच पडून आहे.यामुळे प्रवाश्यांना सावलीसाठी झाडांचा आधार घ्यावं लागतं आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या बसस्थानकाची बांधकाम आवश्यक निधी अभावी रखडल्याची माहिती असून सिरोंचा शहरासाठी आज आंतरराज्य बसस्थानाकाची अत्यावश्यक असल्याने राज्य सरकार व संबंधित परिवहन महामंडळाने येथील आनंतरराज्य बसस्थानकाची बांधकामासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देऊन बसस्थानकाचे बांधकाम पूर्ण करण्याची मागणी नागरिकांकडुन होत आहे.