गडचिरोली जिल्हाशैक्षणिक

आष्टी येथील शासकीय मुलांचे वस्तीगृह पूर्वव्रत सुरू करण्याची मागणी !

विदर्भक्रांती न्यूज नेटवर्क…आष्टी…

आष्टी येथील आदिवासी विद्यार्थ्यांची माजी आमदार दिपक दादा आत्राम यांना निवेदन

आष्टी: येथील आदिवासी मुलांचे शासकीय वस्तीगृह गेल्या दोन वर्षापासून इमारती अभावी बंद आहे परंतु प्रशासनाच्या दुर्लक्षितपणा मुळे इयत्ता आठवी ते पदवीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या सुमारे 70 आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान मागील दोन वर्षांपासून होत आहे .याविषयी वारंवार मागणी करूनही वस्तीगृह सुरू न झाल्यामुळे शैक्षणिक सोयीसुविधे पासून वंचित असलेल्या विद्यार्थ्यांनी शेवटी आदिवासी विद्यार्थी संघाचे विदर्भ नेते व माजी आमदार दिपक दादा आत्राम यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे आष्टी येथील मुलांचे वस्तीगृह पूर्वव्रत सुरू करण्याची मागणी केली आहे.
यापूर्वी आष्टी येथील वस्तीगृह खाजगी मालकीच्या इमारतीत भाड्याने सुरू होता,परंतु इमारत मालकाने अवास्तव भाडेवाढ करत इमारत भाड्याने देण्यास नकार दिला. त्यामुळे इतर ठिकाणी इमारत उपलब्ध न झाल्याने वस्तीगृह बंद पडला.यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. वस्तीगृहाचे गृहपालाने वस्तिगृह सुरू करण्यासाठी येथील मंडळ अधिकारी कार्यालयातील आठ ते दहा खोल्यांची चामोर्शी येथील तहसिलदारांकडे मागणी केली होती ,परंतु महसूल प्रशासनाने आदिवासी विद्यार्थ्यांच्या या मागणीकडे दुर्लक्ष केल्याने आदिवासी समाजातील विद्यार्थी मागील दोन वर्षापासून शिक्षणापासून वंचित आहे. विद्यार्थ्यांनी वस्तीगृह पूर्वव्रत सुरू करण्यासाठी अनेकदा शासन प्रशासनाकडे मागणी केल्यानंतरही वस्तीगृह सुरू करण्यात न आल्याने शिक्षणापासून वंचित असलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांनी वस्तीगृह सुरू करण्याची मागणी घेऊन आदिवासी विद्यार्थी संघाचे नेते व माजी आमदार दिपक दादा आत्राम यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.यावर प्रकल्प अधिकारी गडचिरोली यांना भेटून लवकरात लवकर वस्तीगृह सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार असून वेळप्रसंगी विद्यार्थ्यांसाठी तीव्र आंदोलनही करू,असे आश्वासन माजी आमदार दिपक दादा आत्राम यांनी विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाला दिले. यावेळी सतीश पोरतेट’ पंकज कुसनाके ,सोनी आलाम,सुभम मरापे ,अमोल आलाम , रोहित नैताम,’रुपेश वेलादीसह अनेक विद्यार्थी उपस्थित होते. आदिवासी विकास विभागाच्या अश्याप्रकारचे गलथान कारभाराचा फटका जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांना बसत असून याबद्दल आदिवासी समाजात दिवसेंदिवस तीव्र नाराजी पसरत आहे. जिल्हातील आदिवासी मुला – मुलींचे सर्वच वसतीगृह त्वरीत सुरु करण्याची मागणी होत आहे .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close