आदिवासी समाजातील विद्यार्थी व विद्यार्थिनींना खास बाब अंतर्गत वस्तीगृहात प्रवेश मिळवून द्यावी !
विदर्भक्रांती न्यूज नेटवर्क …गडचिरोली
▪️माजी आमदार श्री.दिपकदादा आत्राम यांची आदिवासी विकास मंत्र्यांकडे निवेदन देवून मागणी ▪️
📝अहेरी, भामरागड,मूलचेरा,सिरोंचा व एटापल्ली या भागातील विद्यार्थी शिक्षणासाठी जिल्हा ठिकाणी व बाहेर जिल्ह्यात प्रवेश घेतले आहे.मात्र आदिवासी वसतिगृहात प्रवेश मिळाले नसल्याने त्यांना अडचण निर्माण होत आहे.आदिवासी विद्यार्थ्यांची
घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने त्यांना भाड्याच्या खोलीत राहून शिक्षण घेवू शकत नाही.
त्यामुळे खास बाब म्हणून आदिवासी समाजातील विद्यार्थी व विध्यार्थींना वसतिगृहात प्रवेश मिळवून देण्यात यावी,अशी मागणी अहेरीचे माजी आमदार श्री.दिपकदादा आत्राम यांनी आज मंत्रालयात महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री ना.विजयकुमार गावित यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देवून मागणी केली आहे.यावर आदिवासी विकास मंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याची माहिती आहे.