जांबियागट्टा येथील ग्रामस्थांसोबत माजी आमदार दिपक दादा आत्राम यांनी साधला जनसंवाद !
विदर्भक्रांती न्यूज नेटवर्क …एटापल्ली…
माजी
आमदार दिपक दादा आत्राम यांच्या जनसंवादाला ग्रामस्थांची
लक्षणीय
उपस्थिती होती
.
एटापल्ली…तालुक्यातील अतिदुर्गम ,नक्षलग्रस्त व मागासलेल्या जांबियागट्टा येथील ग्रामस्थांसोबत आविसंचे विभागीय अध्यक्ष व माजी आमदार दिपक दादा आत्राम यांनी जनसंवाद साधत परिसरातील समस्या जाणून घेतल्या.यावेळी जांबियागट्टा व परिसरातील येथील ग्रामस्थांनी माजी आमदार दिपक आत्राम यांचेसमोर आरोग्य,सिंचन,रस्ते,वनहक्के दावे,शिक्षण,रोजगार असे अनेक ज्वलंत समस्या मांडल्या. जांबियागट्टा व परिसरातील ग्रामस्थांनी मांडलेल्या प्रत्येक समस्यावर तोडगा काढू,आणि जांबियागट्टा सह परिसरातील गावांच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याचे उपस्तितांना यावेळी त्यांनी ग्वाही दिली.
.
माजी आमदार दिपक दादा आत्राम यांच्या जनसंवाद सभेला जांबियागट्टा व परिसरातील गावातील ग्रामस्थांची उपस्थिती लक्षणीय होती. जांबियागट्टा येथे पार पडलेल्या माजी आमदार आत्राम यांचे जनसंवाद सभेला माजी जि.प.सदस्य संजुभाऊ चरडुके, माजी पं. स.सदस्य रमेश तोरे, अजय मडावी,आविस तालुका उपाध्यक्ष श्रीकांत चिप्पावार, जांबिया येथील पोलीस पाटील लूला हिचामी,रमेश हिचामी,चेतन हिचामी,रमेश तोरे, गट्टा येथील पोलीस पाटील कन्ना गोटा, जाजावंडीचे पोलीस पाटील पांडू तुमरेटी, गणेश तुमरेटी, विनोद एक्का, नेंडवाडी येथील बाजीराव मट्टामी,देवाजी मट्टामी, गोरगुटा येथील पोलीस पाटील देवू हिचामी, विलास जोई, टितोडा येथील नंदू वेळदा,लक्ष्मण जेट्टी, सुनील वेळदा, गट्टागुडा येथील बंडू गोटा, लक्ष्मण पुंगाटी,माजी सरपंच विजय कुसनाके, जुलेख शेख,संदीप बडगे सह आविसंचे असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्तीत होते.