प्रसिध्द हर हर शंभू गाण्याची गायिका अभिलिप्सा पांडा व सुप्रसिध्द जागरणकर अजित मिनोचा महाकाली महोत्सवाकरिता येणार चंद्रपुरात
विदर्भक्रांती न्यूज नेटवर्क चंद्रपुर
हर हर शंभू या प्रसिध्द गाण्याची सुप्रसिध्द गायिका अभिलिप्सा पांडा आणि सुप्रसिध्द देवी जागरणकार अजित मिनोचा हे माता महाकाली महोत्सवात सहभाग घेणार आहे. 1 ऑक्टोंबरला देवी जागरणकार अजित मिनोचा यांचे जागरण तर 2 ऑक्टोंबरला निघणारा श्री. माता महकाली नगर प्रदक्षिणेत गायिका अभिलिप्सा पांडा यांचा रोड शो असणार असल्याची माहिती माता महाकाली सेवा समीतीच्या वतीने आमदार किशोर जोरगेवार यांनी दिली आहे.
1 ऑक्टोंबर पासुन चंद्रपूरातील महाकाली मंदिर पटागंणात आयोजित माता महाकाली महोत्सवातील कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे. 4 ऑक्टोंबर पर्यंत चालणाऱ्या या महाकाली महोत्सवाला महाकाली भक्तांचा मोठा सहभाग लाभत आहे. 1 ऑक्टोंबरला शनीवारी सायंकाळी जबलपूर मध्यप्रदेश मधील सुप्रसिध्द देवी गीत जागरणकार अजित मिनोचा यांचा जागरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यावेळी त्यांच्या सोबत ईशांत मिनोचा हे ही देवी गीतांचे सादरीकरण करणार आहे. तर 2 ऑक्टोंबरला आयोजित श्री. माता महाकाली नगर प्रदक्षिणेत समाज माध्यमांवर धमाल माजवत असलेल्या हर हर शंभू या गाण्याची ओडीसा येथील गायिका अभिलिप्सा पांडा आपल्या संचासह रोडशो मध्ये सहभागी होणार आहे. तरी सदर कार्यक्रमाला महाकाली भक्तांसह चंद्रपूरच्या नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहण माता महाकाली महोत्सवाचे संयोजक आमदार किशोर जोरगेवार यांनी केले आहे.
घटस्थापनेच्या मुहुर्तावर माता महाकाली महोत्सवाचे मंडप पुजन
1 ऑक्टोंबर पासून चंद्रपूरातील माता महाकाली मंदिराच्या पटांगणात आयोजित माता महाकाली महोत्सवाचे मंडपपूजन आज घटस्थापनेच्या मुहूर्तावर करण्यात आले. यावेळी माता महाकाली महोत्सवाचे संयोजक आमदार किशोर जोरगेवार, माता महाकाली सेवा समितीचे अजय जयस्वाल, अॅड. विजय मोगरे, मुन्ना व्यास, महादेवराव पिंपळकर, रुपेश कुंदोजवार, वंदना भागवत, प्रा. श्याम हेडाऊ, वंदना हातगावकर, कौसर खान, सविता दंडारे, आशा देशमूख, दुर्गा वैरागडे, विनोद अनंतवार आदींची उपस्थिती होती.
आमदार किशोर जोरगेवार यांच्या संकल्पनेतून तथा महाकाली भक्तगण यांच्या वतीने आयोजित माता महाकाली महोत्सवासाठी माता महाकाली सेवा समितीची स्थापना करण्यात आली आहे. सदर समितीच्या वतीने महोत्सावाचे भव्य नियोजन केल्या जात आहे. दरम्याण आज घटस्थापनेच्या शुभ मुहुर्तावर महोत्सवाचे मंडपपुजन कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी विधीवत पुजन करुन महोत्सवाच्या भव्य मंडप उभारणीला सुरवात करण्यात आली.