अहेरी तालुक्यातील खांदला व आरेंदा या दोन ग्रा.पं.साठी आविसकडून नामांकन दाखल
विदर्भक्रांती न्यूज नेटवर्क…अहेरी तालुका ….
▪️माजी आमदार श्री.दिपकदादा आत्राम यांच्या प्रमुख उपस्थितित
✒अहेरी :- अहेरी तालुक्यातील ग्राम पंचायत कार्यालय खाँदला व आरेंदा दोन ग्राम पंचायतींमध्ये सार्वत्रिक निवडणुका घेण्यात येत असुन दिनांक १६ ऑक्टोबर ला २०२२ ला मतदान होणार आहे.
या सार्वत्रिक निवडणुकामध्ये जनतेतून थेट सरपंच पद निवड करायचे आहे.
आज सदर दोन्ही हि ग्राम पंचायत सार्वत्रिक निवडणुका करिता आदिवासी विद्यार्थी संघाकडून नामांकन दाखल करण्यात आली.असून आदिवासी विध्यार्थी संघाचे विदर्भ नेते माजी आमदार श्री दिपकदादा आत्राम यांच्या नेत्रुत्वात व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या मार्गदर्शनात आज तहसील कार्यालयात निवडणुक निर्णय अधिकारी श्री.कवीश्वर साहेब,चव्हाण साहेब,सहायक निवडणुक अधिकारी श्री.कोटगले साहेब,यांच्याकडे नामांकन दाखल करण्यात आली.
खाँदला ग्राम पंचायतसाठी प्रभाग क्र. 1 मधून श्री.विनायक वेलादी ,राणी तलांडे,तिरुपका चिंतावार,तर प्रभाग क्र.2 मधून श्री.किशोर आलाम,सौ.जयवांता गोलेटीवार,जोती आलाम,तर प्रभाग 3 मधून श्री.सुरेश पेंदाम,विश्रांती चालुरकर,व्रुंदा सिडाम,तर सरपंच पदासाठी सौ.शंकुतला कूळमेथे,सौ.सुशीला सिडाम यांनी नामांकन टाकले आहे.
तसेच आरेंदा ग्राम पंचायत सरपंच पदासाठी श्री.साईनाथ आत्राम,इरपा आत्राम,तर सदस्य पदासाठी वंजा आत्राम,माधुरी आत्राम,सारा वेलादी,रेश्मा दहागावकर,संतोष आत्राम,छाया तलांडी,आदि नामांकन दाखल केले.
यावेळी आदिवासी विद्यार्थी संघाचे विदर्भ नेते तथा माजी आमदार श्री.दिपकदादा आत्राम, यांच्या सहित अहेरी पंचायत समितीचे माजी सभापती श्री.भास्कर तलांडे, माजी जि.प.सदस्य श्री.अजय नैताम,पेरमिलीचे सरपंच सौ.किरणताई कोरेत,आलापलीचे माजी सरपंच तथा विद्यमान ग्राम पंचायत सदस्य श्री.विजय कुसनाके, पेरमिलीचे माजी सरपंच तथा विद्यमान ग्राम पंचायत श्री.प्रमोद आत्राम,आविस कार्यकर्ते माधव कूळमेथे,साजन गावडे,कवीश्वर चंदनखेळे, जूलेख शेख,संदीप बडगे,कार्तिक तोगम,,व आविस कार्यकर्ते उपस्थित होते.