मूलचेरा तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्तांना तात्काळ नुकसान भरपाई मिळवून द्या !
विदर्भक्रांती न्यूज नेटवर्क ..मूलचेरा
आविसं
पदाधिकाऱ्यांची माजी आमदार दिपक दादा आत्राम यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्र्यांना निवेदन मूलचेरा....तालुक्यातील आदिवासी विद्यार्थी संघाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आज आविस नेते व माजी आमदार दिपक दादा आत्राम यांच्या नेतृत्वात मूलचेऱ्याचे तहसीलदार कपिल हटवार यांची भेट घेत त्यांच्या मार्फतीने तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्तांना तात्काळ नुकसान भरपाईसह ज्वलंत समस्यांचे निवेदन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना पाठविले आहे. आविसंने मुख्यमंत्र्याना पाठविलेल्या निवेदनात,तालुक्यातील लगाम ,कोलपल्ली,कोठारी,मल्लेरा व
मूलचेरा या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने या रस्त्याची पूर्णपणे चाळणी झाली असून या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे महामंडळाने बससेवा बंद केल्याने सर्वसामान्य नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत असून तसेच या रस्त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांचेही शैक्षणिक नुकसान होत असून तात्काळ या रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात यावी,तसेच जुलै-महिन्यात झालेल्या अतिवृष्टीची फटका तालुक्यातील शेतकऱ्यांना बसले असून यात शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाल्याने सर्व अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ सरकारकडून नुकसान भरपाई मिळवून देण्याची मागणी सह तालुक्यातील प्रलंबित वनहक्के दावे निकाली काढून अतिक्रमणधारक शेतकऱ्यांना कायम वनहक्क पट्टे देण्यात यावी,मूलचेरा ते बोलेपल्ली व मूलचेरा ते अंम्बेला या रस्त्यांचे दुरुस्तीसह रुंदीकरण करण्यात यावी आणि येथील शासकीय आदिवासी मुलांचे व मुलींचे वस्तीगृह त्वरित सुरू करून डीबीटी विद्यार्थ्यांच्या खात्यात तात्काळ जमा करून वस्तीगृहात भौतिक सुविधा पुरवण्यात यावी,असे अनेक मागण्याच्या समावेश आहे.
तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर केल्यानंतर माजी आमदार दिपक दादा आत्राम यांनी तहसीलदार कपिल हटवार यांचे सोबत तालुक्यातील विविध समस्यांवर चर्चा केले असता तहसीलदार हटवार यांनी येत्या दोन ते तीन दिवसांत अतिवृष्टीग्रस्तांच्या बँक खात्यामध्ये नुकसान भरपाई जमा करू व अन्य समस्यांचे सोडवणुकीसाठी आवश्यक पाठपुरावा करू,असे आश्वासन माजी आमदार आत्राम व आविस शिष्टमंडळाला दिले. तहसीलदार कपिल हटवार यांना निवेदन देतांना माजी आमदार दिपक दादा आत्राम यांचे सोबत आविसचे नगरसेविका सुनीता कुसनाके,नगरसेवक बंडू आलाम, कोठारीचे माजी उपसरपंच रविभाऊ झाडे,नगरसेवक संतोष चौधरी,देवदाचे उपसरपंच संतोष तुमरेटी, ग्रा.पं.सदस्य गुरुदास कडते,लगामचे माजी सरपंच मनिष मारटकर,विजय कुसनाके माजी सरपंच,सतीश पोरतेट, विनोद मडावी,जुलेख शेख,संदीप बडगे,संदीप तोरे, मनोहर हलामी,रंजित आलाम,संतोष तोरे,मोतीराम मडावी,रेखनकर गरतुलवार सदस्य ग्रा प कोठारी,नरेश कांदो उपसरपंच वेंगणुर, सोनिया गावडे सह आविस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्तीत होते.