मेडिगड्डा सिंचन प्रकल्प प्रभावित शेतकऱ्यांना नुकसान भरपाईसह सोमनपल्ली गावाची पुनर्वसन करा.
विदर्भक्रांती न्यूज नेटवर्क…गडचिरोली
गडचिरोली: सिरोंचा तालुक्यातील
गोदावरी नदीवर तेलंगणा सरकारने बांधलेल्या मेडिगड्डा- कालेश्वर या महत्वकांक्षी सिंचन प्रकल्पामुळे सिरोंचा तालुक्यातील अनेक गावे प्रभावित होत, शेकडो एकरावरील शेती जमीन पाण्याखाली जाऊन उभी पिके नष्ट होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर अनेक संकटे उभे असून राज्य सरकारकडून तात्काळ प्रभावित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देऊन या प्रकल्पामुळे रस्त्यावर आलेल्या सिरोंचा तालुक्यातील सोमनपल्ली या गावाची पुनर्वसन करण्याची मागणी माजी आ.दिपक दादा आत्राम यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुंबई येथे मंत्रालयात भेट घेऊन त्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
दरवर्षी मेडिगड्डा कालेश्वर सिंचन प्रकल्पाच्या बॅकवॉटर मुळे सिरोंचा तालुक्यातील अनेक एकर उपजाऊ शेतजमीन पाण्याखाली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पीक घेणे कठीण झाले आहे.सोबतच या वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे व प्रकल्पाचे बॅकवॉटरमुळे सोमनपल्ली या गावात पुराचे पाणी घुसल्याने चक्क गावकऱ्यांनी अनेक दिवसांपासून रोडवर आपले बिऱ्हाड घेऊन गुजराण करावी लागत आहे.
मेडीगड्डा सिंचन प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांच्या चुकीच्या नियोजनामुळे सोमनपल्ली व या परिसरातील नागरिकांना तीव्र फटका बसत आहे त्यामुळे त्वरीत सोमनपल्ली गावाचे पुनर्वसन करण्यात यावे.
येथील विद्यार्थ्यांची शाळा बुडाली त्यामुळे त्यांच्या शिक्षणाची सोय करन्याची मागणीही माजी आ.आत्राम यांनी केली आहे.
अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे पीक नष्ट झाले आहे त्यामुळे नुकसान ग्रस्त शेतीचें त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी माजी आ.दीपक दादा आत्राम यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री व गडचिरोलीचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा करून चर्चेअंती त्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.