Gamesभामरागड तालुका

दुब्बागुडम येथे माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते व्हॉलीबाल व क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन

विदर्भक्रांती न्यूज नेटवर्क..भामरागड तालुका

📝भामरागड शहरातील न.प.अतंर्गत येणाऱ्या दुब्बागुडम येथे डी. कॅपिटल. क्रीडा मंडळ दुबई यांच्या वतीने भव्य टेनिस बॉल क्रिकेट व व्हॉलीबाल स्पर्धेच्या आयोजन करण्यात आले होते.सदर क्रिडा स्पर्धेसाठी पहिला पारितोषिक मा.जिल्हा परिषद अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडून तर दूसरा व तिसरा असे तीन पुरस्कार या ठिकाणी देण्यात येणार आहे.आज सदर स्पर्धेचे उदघाटन .मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार माजी जिल्हा परिषद अध्यक्ष,यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी मंचावर श्री.निलेश वेलादी सरपंच ,श्री.प्रमोद आत्राम माजी सरपंच पेरमल्ली, माजी सरपंच सुधाकर तिम्मा, प्रशात गोडसेलवार नगरसेवक नगरपंचायत अहेरी,तपेश भय्या हलदर,नरेंद्र गर्गम, लालसू आत्राम होते.तर कार्यक्रमाच्या संचालन व आभार प्रदर्शन श्री.कोलू पुनगाठी यांनी केली.यावेळी मंडळाचे अध्यक्ष श्री.कोलू पुंगाटी,उपाध्यक्ष राकेश पुंगाटी, कोषाध्यक्ष :-अमलू तेलामी,चैतु पिडसे, बना पंगाटी, राकेश पंगाटी, चैतु पिडसे,अमलू तेलामी,घिस्सु पंगाटी, डोलू वड्डे,पुसू तेलामी व गावातील नागरिक उपस्थित होते..!!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close