सिरोंचा तालुका

मेडिगड्डा प्रकल्प बाधित शेतकऱ्यांची सिरोंचा तहसील कार्यालयावर धडक !

विदर्भक्रांती न्यूज नेटवर्क …सिरोंचा तालुका

सिरोंचा तालुक्यातील मेडिगड्डा -कालेश्वर सिंचन प्रकल्पाचे बाधित शेतकऱ्यांनी आज सिरोंचा तहसिल कार्यालयावर धडक देत विविध मागण्यांचे निवेदन तहसिलदार मार्फत राज्याचे उपमुख्यमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविले आहे.प्रकल्प बाधित शेतकऱ्यांनी पाठविलेल्या निवेदनात,तेलंगण सरकारची महत्वकांक्षी प्रकल्पाच्या बॅकवॉटरमुळे मागील चार वर्षांपासून संपूर्ण तालुकाच बुडित क्षेत्रातीलखाली आली असून यात दरवर्षी शेतकऱ्यांचे उभीपिके नष्ट होत आहे.मागील तीन वर्षांपासून प्रकल्पाकडून उर्वरित भूसंपादन प्रक्रिया रखडल्याने शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे. प्रकल्पबाधित शेतकऱ्यांची भूसंपादन प्रक्रिया तात्काळ राबवून यापूर्वी प्रकल्प जवळील पोचमपल्ली, वडधम,पेंटींपाका व तुमनूर या गावातील शेतकऱ्यांची शेतजमीन जसे थेट खरेदी पद्धतीने प्रति एकर वीस लाख रु.आर्थिक मोबदला देण्याची मागणी केली आहे.

यावेळी मेडिगड्डा प्रकल्प बाधित शेतकऱ्यांनी तेलंगणा व महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांना सुद्धा पोस्ट कार्ड पाठवून प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ न्याय मिळवून देण्याची मागणी केली आहे.

यापूर्वी बाधित शेतकऱ्यांनी येथील तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले होते.या आंदोलनाची दखल घेत अहेरीचे उपविभागीय अधिकाऱ्यांनी बाधित शेतकऱ्यांची येथील तहसील कार्यालयात सुनावणी बैठक घेऊन पिडीत शेतकऱ्यांची भूसंपादन प्रक्रिया राबविण्याचे संबंधित विभागाला तसे आदेशीत केले होते.परंतु या भूसंपादन प्रक्रियेमुळे बाधित शेतकऱ्यांना कमी मोबदला मिळण्याची शक्यता बाधितांनी निवेदनातुन व्यक्त केले असून प्रकल्पबाधित शेतकऱ्यांना दोन्ही सरकारांकडून थेट खरेदी पद्धतीने भूसंपादन प्रक्रिया राबवून प्रति एकर 20 लाख .रु.प्रमाणे येत्या 7 नोव्हेंबर पर्यत मोबदला न मिळाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याची इशारा बाधित शेतकऱ्यांकडून सरकारला देण्यात आली आहे. तहसीलदारांना निवेदन देतांना शेकडो प्रकल्प बाधित शेतकरी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close