माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते उमानूर येथे विकासकामांचे भूमिपूजन
विदर्भक्रांती न्यूज नेटवर्क…अहेरी तालुका
📝अहेरी तालुक्यातील ग्राम पंचायत उमानूर ग्राम पंचायत अतंर्गत येत असलेल्या सुध्दागुड्म,जोगनगुडा,सिलमपली येते शाळेत संरक्षण भिंत व आवश्यक ठिकाणी मोरी बांधकामाचे भूमिपूजन जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्री. अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते करण्यात आले आहे.अनेक दिवसांपासून यासाठी मागण्या रेटून धरला असता जि.प.अध्यक्ष असताना जिल्हा परिषदेच्या १५ व्या वित्त योजनेअंतर्गत मंजुरी देऊन सदर कामाचे भूमिपूजन केले आहेत.या भूमिपूजन सोहळ्याला अहेरी पंचायत समितीचे माजी सभापती श्री.भास्कर तलांडे,माजी सभापती सौ.सुरेखा आलाम, माजी जि.प.सदस्य, अजयभाऊ नैताम, उमानूरचे माजी सरपंचा सौ.ताराबाई आसाम,शामराव गावडे,लक्ष्मीस्वामी अठेला,राजारामचे माजी उपसरपंच श्री.संजय पोरतेट,जयराम आत्राम,संदीप आत्राम,नामदेव पेंदाम,नरेंद्र गरगम,दिपक अर्का,इरसाद शेख,व नागरिक उपस्थित होते.