मूलचेरा तालुकाविकास कार्य

कोठारी ग्राम पंचायत अंतर्गत विकासकामांचे माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न !

विदर्भक्रांती न्यूज नेटवर्क

📝मुलचेरा तालुक्यातील कोठारी ग्राम पंचायत अंतर्गत लभानतांडा, कोपरल्ली चेक व कोलपल्ली येथे विविध विकास कामांचे भूमीपूजन माजी जिल्हा परिषद अध्यक्ष मा.अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते करण्यात आले.अनेक वर्षापासून लोकांच्या मागणी असताना याकडे दुर्लक्ष केले जात होते मात्र सरपंच व सदस्यांनी गावातील समस्या माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्याकडे गावातील समस्या मांडले असता त्यावेळेस जिल्हा परिषदेच्या माध्यमातून गावातील विविध विकास कामे मंजूर करून गावातील समस्या सोडवण्याचा प्रयत्न केले आणि विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून दिले. विविध कामांचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते करण्यात आले .माजी जि.प.अध्यक्ष कंकडालवार यांच्या कार्याबद्दल कोठारी ग्राम पंचायत हद्दीतील नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

या भूमिपूजन सोहळ्याला रोशनी कुसनाके सरपंच कोठारी,.कालिदास कुसनाके सदस्य,पल्लवीताई रतनपुरे सदस्या, जीवणकला तलांडे सदस्या, अरुण कडते सरपंच,कालिदास चौधरी,सुनीता कुसनाके नगरसेविका मुलचेरा,नरेश कोवे,पंकज कुसनाके,उमेश आत्राम,सुरेश कुसनाके,शामराव पोरतेट, गुरुदास कडते,संदीप तोरे,रवींद्र झाडे, कार्तिक डोखे,मनीष मारटकर,कमल बाला, श्रीकांत समदार व गावातील नागरीक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close