अहेरी तालुका

राजपूर पॅच व बोरी ग्राम पंचायत अंतर्गत अनेक विकास कामांचे भूमिपूजन व उदघाटन संपन्न

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क

  • ढोल ताशांच्या गजरात करोडो रुपयांच्या अत्यावश्यक जनतेच्या हितार्थ विकास कामांचं भूमिपूजन, राजपूर पॅच येथे पाण्याची टाकी, वाढीव पाईप लाईन, सह हात पंप भूमिपूजन, रामपूर चेक येथे जनसुविधा योजने अंतर्गत नाली बांधकाम, सह शोष खड्डे बांधकामाचं भूमिपूजन, मौजा -शिवणीपाठ येथे रोड सह हात पंप भूमिपूजन सह इतर विकास कामांचं भूमिपूजन माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते करण्यात आले.

📝अहेरी तालुक्यातील ग्रा.प.राजपूर पॅच व ग्रा.प.बोरी अंतर्गत विविध विकास कामांचे भूमी पूजन माजी जिल्हा परिषद अध्यक्ष मा.अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते करण्यात आले आहे.अनेक वर्षापासून लोकांच्या मागणी असताना या कडे दुर्लक्ष केले जात होते मात्र सरपंच व सदस्यांनी व गावातील प्रतिस्टित नागरिकांनी समस्या मा.जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार सा.यांच्या कडे गावातील समस्या विषय सांगितले त्या वेळेस जिल्हा परिषदेच्या माध्यमातून गावातील विविध विकास कामे मंजूर करून गावातील समस्या सोडवण्याचा प्रयत्न करण्यात आले आणी सदर कामांचे भूमिपूजन करण्यात आले तर गावातील नागरीक समादान व्यक्त केले. यावेळेस भूमिपूजनकार्यक्रमाला बोरी नागेपल्ली चे माजी ज़िल्हा परिषद सदस्य मा.सुनिताताई कुसनाके, माजी पंचायत समिती सदस्य छायाताई पोरतेट,बोरी ग्रामपंचायत चे सरपंच, शंकर कोडापे, उपसरपंच परागजी ओलालवार,राजपूर ग्रामपंचायत चे सरपंच मीनाताई वेलादी, ग्रामपंचायत चे माजी उपसरपंच तथा विद्यमान सदस्य सुरेशजी गंगाधरीवार,माजी सरपंच तथा विद्यमान सदस्य मधुकर वेलादी,सामाजिक कार्यकर्ते नितीनजी गुंडावार, ग्रामपंचायत उपसरपंच कोकिरवार मडम,ग्रामपंचायत सदस्य संतोष पंदीलवार,बंडूभाऊ तलांडे, पांडुरंग जी, रामटेके, मुरलीधर जी कोडशेपवार, मारोती पुल्लीवार, दिवाकर चाटारे, पेंटूजी अलोणे, प्रवीण निकेसर, श्रीनिवास औनूरवार, ग्रामसेवक दर्रो साहेब, सुंदराबाई मडावी माजी ग्रामपंचायत सदस्य, मुकुंदा ठाकरे माजी ग्रामपंचायत सदस्य, विलासजी निकसर पोलिस पाटील प्रशांत गोडसेलवार नगरसेवक अहेरी, राकेश सडमेक व गावातील नागरीक उपस्थित होते..!!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close