नाट्यक्षेत्रातील प्रत्येक कलावंत हे बॉलिवूडचे प्रतिबिंबच !

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क
एटापल्ली.... शहरी भागातल्या लोकांना आज टॉलीवूड,हालीवूड व बॉलीवूड सारखं अनेक मनोरंजनाचे माध्यम असले तरी ग्रामीण भागातील लोकांना मात्र मनोरंजनाचे मुख्य माध्यम हे नाट्यक्षेत्र असून या संगणकीय युगातही ग्रामीण भागांमध्ये सादरीकरण होणाऱ्या नाटकांना अनन्य महत्व असून नाट्यक्षेत्रातुन आपल्यामधील कला गुणांचे सादरीकरण करणारे प्रत्येक कलावंत हे बॉलीवूडचे प्रतिबिंबच आहेत, असे मोलाचे मार्गदर्शन आदिवासी विद्यार्थी संघाचे नेते व माजी आमदार दिपक दादा आत्राम यांनी केले. ते एटापल्ली तालुक्यातील चंदनवेली येथील ओम शिवशंकर नाट्य कला मंडळाच्या वतीने नानाजी वैरागडे पाटील रंगभूमीवर आयोजित *कुंकू पुसलं सौभागिणीचं* या नाटकाचे उदघाटनप्रसंगी बोलत होते. नाटकाचे उदघाटन सोहळ्याला सहउदघाटक म्हणून आविसचे युवा नेते व माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार तर अध्यक्ष म्हणून माजी जिल्हा परिषद सदस्य कारुजी रापंजी, सहअध्यक्ष म्हणून माजी जिल्हा परिषद सदस्या अनिताताई आत्राम तर
प्रमुख अतिथी म्हणून आविस तालुका अध्यक्ष नंदुभाऊ मट्टामी, माजी जि.प.सदस्य संजुभाऊ चरडूके,ग्राम पंचायत सदस्या गिताताई मट्टामी, धरतीताई वैरागडे,रमेश वैरागडे,माजी पंचायत समिती सदस्या वनीताताई तिम्मा,माजी उपसरपंच केशव कुडयेटी, आविस तालुका उपाध्यक्ष श्रीकांत चिप्पावार, पोलीस पाटिल सदाशिव कुडयेटी, गाव मुखीया गणेश मडावी, प्रज्वल नागुलवार, सुरेंद्र वैरागडे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी आविसचे युवा नेते व माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी आपल्या भाषणातून नाट्यकला क्षेत्रातील कलावंताबद्दल बहुमूल्य मार्गदर्शन केला. चंदनवेली येथे आयोजित *कुंकू पुसलं सौभागिणीचं* या नाटकाचे उदघाटन सोहळ्याचे यशस्वीतेसाठी मंडळाचे पदाधिकारी व सदस्यांनी परिश्रम घेतले.