तोडसा ग्रा.पं. निवडणूक संदर्भात माजी आमदार दिपक दादा आत्राम यांनी दोड्डी येथे केली कार्यकर्त्यांसोबत चर्चा !

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क
एटापल्ली.....तालुक्यातील तोडसा ग्राम पंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूक संदर्भात आदिवासी विद्यार्थी संघाचे विभागीय अध्यक्ष व माजी आमदार आत्राम यांनी काल रात्री दोड्डी येथे उमेदवारांच्या प्रचार करून तद्नंतर कार्यकर्त्यासोबत चर्चा करून आदिवासी विद्यार्थी संघाचे पॅनलचे उमेदवारांना निवडून आणण्यासाठी परीश्रम घेण्याचे आव्हान केले. यावेळी दोड्डी येथे कार्यकर्त्यांसोबत व आविस पॅनलचे उमेद्वारांसोबत चर्चा करतांना माजी आमदार दिपक दादा आत्राम यांचे सोबत आविस तालुका अध्यक्ष नंदुभाऊ मट्टामी, माजी जि.प.सदस्य संजुभाऊ चरडूके,माजी पं.स.सदस्य मंगेश हलामी, आविस तालुका उपाध्यक्ष श्रीकांत चिप्पावार, आविस तालुका सचिव नानेश गावडे,कोकण सरकार,पॅनलचे उमेदवार मंगेश गावडे,पोलीस पाटील रैनू मट्टामी,माजी सरपंच विजय कुसनाके,जुलेख शेख,संदीप बडगे,नदीम सय्यद सह आदिवासी विद्यार्थी संघाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्तीत होते.